डोंगरगाव भु. येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

:- बौध्द पंचशील समाज डोंगरगाव भु. यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या आनंदाने बौद्ध विहार परिसरात पार पडला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच छाया खरकाटे तर प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठलजी पेठ्ठवार, मुख्याध्यापक संदीप राऊत, उरकुडे सर,निकुरे सर,मोहनजी भुते,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नानाजी राऊत,उपसरपंच लोमेशजी सहारे,पोलीस पाटील वंदना राऊत,आरोग्य सेवक शशिकांत मडावी,प्रहारचे निखिल धार्मिक, चंदा राऊत,ग्रा.प सदस्य सुलोचना ढोरे,प्रियांका कूथे, पूजा चहांदे,अल्का कुभरे,निलकंठ बगमारे, सचिन कूथे, अक्षय ठाकरे,वन समिती अध्यक्ष लोचन ढोरे, शासकीय ठेकेदार अविनाश चहांदे,नरेश बारसागडे,विठ्ठल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते,
सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालाअर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आरोग्य सेवक मडावी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याविषयी योग्य मार्गदर्शन केल,
तर उरकुडे सर यांनी बाबासाहेब विषयी त्यांनी माणसाला माणसात कस आणून आपली छाप देशातच नाही तर जगभरात कशी व्यापली या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले
या कार्यक्रमाला बहुसंख्य गावकरी, बौद्ध पंचशील समाजाचे कार्यकते उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन पुण्यवान नागदेवते यांनी केले तर आभार नितीन शेंडे यांनी मानले,