आरमोरीत आजपासून तीन दिवसीय बुध्दजयंती उत्सव

 

आरमोरी…..तथागत भगवान गौतम बुध्दाच्या परिशुध्द जीवनाचा व मंगलमय व अति वैशिष्ट्यपुर्ण घटनाक्रमाचा दिन म्हणजे बुध्द पोर्णिमा! या महत्वपूर्ण दिनाचे औचित्य साधून जेतवन बौध्द समाज विकास मंडळ, आरमोरीच्या वतीने दिनांक ५ मे ते ७ मे पर्यंत तिन दिवसीय बुध्द जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दिनांक ५ मे ला रात्रो ७.३० वाजता बुध्द पौर्णिमा जयंती महोत्सवाचे उद्घाटन प्रेरणा शिक्षण संस्था, वडधाचे अध्यक्ष मदन मेश्राम यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजकुमार शेंडे हे राहणार आहेत. तर सहउद्घाटक म्हणुन शिक्षणमहर्षी भाग्यवान खोब्रागडे हे तर सत्कारमूर्ती म्हणुन
भिवापुरचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट, पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे हे उपस्थित राहनार आहेत.
विशेष अतिथी म्हणुन सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई गेडाम , सामाजिक विचारवंत जयकुमार मेश्राम, पोलिस निरिक्षक संदिप मंडलीक, सामाजिक कार्यकर्ते योगेन्द्र बन्सोड, वन परिक्षेत्रअधिकारी अविनाश मेश्राम, नगराध्यक्ष पवन नारनवरे , माजी प. स. सभापती अशोक वाकडे, तथागत बुध्द बिहार आरमोरीचे अध्यक्ष यशवंत जांभूळकर, नगरपरिषद सभापती भारत बावनथडे विलास पारधी, नगरसेवक प्रशांत सोमकुंवर ,माजी प्राचार्य पि.के. सहारे., डॉ. प्रदिप खोब्रागडे डॉ. रायपुरे , प्राचार्य साईनाथ अदलवार, प्राचार्य सुरेश चौधरी, माजी जि. प. सभापती वेनुताई ढवगाये, डॉ. शिलु चिमुरकर , प्रा. स्नेहा मोहले आदी उपस्थीत राहणार आहेत.

शनिवार दिनांक ६ मे ला रात्रौ ७.३० वाजता लॉर्डबुध्द टिव्ही फेम चंद्रपूर येथील प्रविण वाळके यांचा “अमृतवाणी ही बुध्दाची, हा समाजप्रबोधनपर बुध्द भीम गीतांचा कार्यक्रम होणारं आहे.

रविवार दिनांक ७ मे रोजी सायंकाळी जेतवन बुध्द विहारात भंते विमल किर्ती, व भिक्कुनी सुमेधा (सावंगी) यांच्या उपस्थितीत सामुहिक बुध्द वंदना, भोजन दान, देन्यात येणार आहे.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जेतवन बौद्ध समाज विकास मंडळाचे अध्यक्ष लोकमित्र बारसागडे, सचिव
प्रा. अमरदिप मेश्राम, उपाध्यक्ष कमलेश गोवर्धन, सहसचिव सुगत बांबोळे व जेतवन बौध्द समाज विकास मंडळ व नवयुवक मंडळ, महिला सदस्य आदींनी केले आहे.