आरमोरी… आरमोरी वडसा मार्गावर शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान मार्ग ओलांडताना पाच वाघाचे एकाचवेळी दर्शन झाल्याने एका वाहनचालकाने वाघाचा व्हिडिओ शूट केला .सदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी सदर व्हिडिओ व्हॉट्स ॲप स्टेटस वर ठेवला सुध्दा आहे.
वडसा वनविभागातील आरमोरी , वडसा व पोर्ला वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून वाघाचे अस्तित्व असून मोठ्या प्रमाणात वावर सूरू आहे. आरमोरी तालुक्यांतील रवि, अरसोडा, मुलूर, कासवी आष्ठा, व कोंढाळा, उसेगव व इतर परिसरात जगंल लागून असल्याने वाघाचा या क्षेत्रात मोठ्य प्रमाणात वावर सूरू आहे. मागील वर्षी मानव आणि वाघाच्या संघर्षात अनेकांचा बळीही गेला होता. त्यामुळें लोकांनी वाघाच्या भितीने जंगलात जाणे सोडले आहे….
आरमोरी वडसा मार्गावर आरमोरी पासुन कोंढाळा पर्यंत दुतर्फा जंगल लागून असल्याने अनेकदा वाहन धारकांना रस्ता ओलांडताना वाघाचे दर्शन होत असते. शुक्रवार दिनांक २४ ला रात्रौ वडसा मार्गावर एकच वेळी एक मोठा वाघ व चार मोठ्या पिल्ल्याचे दर्शन रस्ता ओलांडताना झाले. त्यामुळें लोकामध्ये सध्या हा विषय कुतूहलाचा बनला आहे. अनेकांनी सदर वाघाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला. तर अनेकांनी आपल्या व्हॉट्स ॲप वर स्टेटस वर ठेवला आहे.
वाघ बघण्यासाठी रात्री कुणीही फिरू नये… अन्यथा दंडात्मक कारवाई …. वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम
आरमोरी वडसा मार्गालगतच्या जंगल परिसरात वाघाचे अस्तीत्व असल्याने वाघाचे ओपन दर्शन होत आहे. त्यामूळे रात्रीच्या वेळेस कुणीही वाहन धारकांनी वाघ बघण्यासाठी फिरू नये. असे आधळल्यास वन विभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळें कुणीही वाहन घेऊन फिरू नये असे आवाहन आरमोरीचे वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांनी केले आहे.