विकसित देशाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गावांचा विकास करणे काळाची गरज आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन

 

गाव हा विश्वाचा नकाशा! गावावरून देशाची परीक्षा!गावची भंगता अवदशा!येईल देशा! असे महान विचार देत आपल्या खंजेरी वादनाच्या माध्यमातून समस्त मानवाच्या कल्याणासाठी गाव गावाशी जागवा!भेदभाव समुळ मिटवा!लावा ग्रामोन्नतीचा दिवा असा मौलिक विचार देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावाच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नसल्याचे तत्कालीन स्थितीतच अधोरेखित केले होते जे वास्तव आहे.केवळ रस्ते,नाल्या बांधून गावाचा विकास होत नाही तर गावातील नागरिकांची आर्थिक,सामाजिक व नैतिक उन्नती झाल्याशिवाय विकासाची संकल्पना मांडता येत नाही.यास्तव विकसित देशाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नागरिकांनी एकञ येऊन विकासाची मुळ संकल्पना अस्तित्वात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
ते देसाईगंज तालुक्यातील रावणवाडी येथील श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ व समस्त ग्रामवासी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणा प्रसंगी आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरड्डीवार यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी, बोळधा ग्रामपंचायतच्या सरपंचा भाग्यश्री गायकवाड, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये,भाजपा तालुका अध्यक्ष राजु जेठानी, कुरखेड्याचे माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे,माजी सभापती मोहन पा.गायकवाड,माजी उपसभापती गोपाल उईके, अर्चना ढोरे,सामाजिक कार्यकर्ते भाग्यवान खोब्रागडे, माजी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी लाडे,उपसरपंच राजेंद्र गायकवाड,गोपाल नाकाडे, हिरामन नाकाडे, चिंतामण लांजेवार,डाकराम नाकाडे,भाग्यवान लाडे, विशाल डांगे,भगवान गायकवाड,वामन आळे, परसराम वल्के,पुष्पराज गायकवाड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरड्डीवार म्हणाले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा देऊन आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक,सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था,राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले तर तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ असल्याने शैक्षणिक गुणवत्तेतुन जागृकता प्राप्त करून महाराजांचे विचार प्रत्यक्ष अंमलात आणणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून दहिहंडी गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.