दडपशाहीचे धोरण स्वीकारणाऱ्या सरकारला येणाऱ्या काळात मतदानाच्या माध्यमातून धडा शिकविला पाहिजे – डॉ. नामदेव किरसान.

मौजा धानोरा ता. धानोरा जि. गडचिरोली येथे माँ दंतेश्वरी नाट्य कला मंडळ धानोराच्या वतीने आयोजित “दत्तक पुत्र” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करतांना सांगितले की, जनतेला मोठमोठे आश्वासने देऊन सत्तेत आल्यानंतर एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, प्रत्येकाला पक्क घर देऊ, विदेशातून काळा धन आणून प्रत्येकाच्या खात्यात 15- 15 लाख रुपये जमा करू म्हणणाऱ्या सरकारने 2022 लोटून गेलं तरी एकही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्याऐवजी मोठ्या प्रमाणावर महागाई व बेरोजगारी वाढवून तसेच देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आणून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ करून जनतेला हलाखीचे जीवन जगण्यास बाध्य करण्यात आले. अशा पद्धतीने गरिबातील गरिबांना लुबाडून व जीवन विमा निगम आणि राष्ट्रीयकृत बॅंकातील पैसा मूठभर पुंजीपतींच्या घशात घालण्याचे काम सरकार करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड प्रकल्प बाधित 13 गावातील लोकांना कडेकोट बंदोबस्तामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आणून त्यांच्या वतीने कोणालाही बोलू न देता त्यांना दडपणात ठेवून व जनसुनावणीत बीजेपी चे आमदार खासदार वगळता इतर कोणालाही प्रवेश न देता दडपशाहीचे धोरण वापरून जन सुनावणी करण्यात आली. अशा रीतीने कोणत्याही आश्वासनाची पूर्तता न करता पुंजी पतींचे घर भरणाऱ्या व दडपशाहीचे धोरण स्वीकारणाऱ्या भाजप सरकारला येणाऱ्या काळात कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सद सद विवेक बुद्धीचा वापर करून मतदानाच्या माध्यमातून धडा शिकविला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार तथा आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष परसराम पदा, नगराध्यक्ष पौर्णिमा ताई सय्याम, माजी जि प सदस्य एड. गजाननजी दुग्गा, माजी जि प सदस्य विनोद पाटील लेनगुरे यांनी मार्गदर्शन केले. मंचावर प्रभाकरजी वासेकर, रजनीकांतजी मोटघरे, रुपेशजी टिकले, नितेशजी राठोड, चंदू पाटील किरंगे, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.