भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली यांचा एकदिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्ग बहुसंख्येने संपन्न

*देसाईगंज:

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली तालुका देसाईगंज (वडसा) यांच्या वतीने बूथ रचना सशक्तिकरण अभियानाअंतर्गत शक्ति केंद्रप्रमुख/ शक्ति केंद्र विस्तारक यांचा एकदिवशीय जिल्हा प्रशिक्षण वर्ग आज दिनांक 05 मार्च 2023 रोजी देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालय येथे भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्रजी कोटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
आपल्या मंडळातील बूथ सशक्तीकरण अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष घालून काम करणे गरजेचे आहे. भाजपा वाढीसाठी राज्य व केंद्र सरकारचे जनकल्याणकारी योजना ह्या लाभार्थ्यांला मिळवून देण्यासाठी परिश्रम घ्यावे. तसेच आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा बहुचर्चित असा कार्यक्रम म्हणजे “मन की बात” कार्यक्रम हा प्रत्येक बूथ स्तरावर राबवून “मन की बात” कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर, खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार डॉ. देवराव होळी, सहकार महर्षी तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री प्रकाशजी सावकार पोरेड़्डीवार, प्रद़ेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंदजी कुथे सर, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, देसाईगंज तालुकाध्यक्ष राजुभाऊ जेठानी, जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, कार्यकर्ते या प्रशिक्षण वर्गाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.