शेतकऱ्यांचा शंकरपुर स्थित महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा
देसाईगंज-
देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली,माञ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना भारनियमन करून फक्त ८ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने धान पिक करपु लागले आहेत.त्यामुळे येथील शेतकरी पुरते बरबाद होण्याची दाट शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना येत्या तीन दिवसाच्या आत २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी देसाईगंजच्या महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांच्या मार्फतिने उर्जा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवलेल्या निवेदनातुन केली होती.माञ मागणीची दखल घेण्यात आली नसल्याने अखेर २४ तास वीज पुरवठ्यासाठी आज( १६ मार्च) रोजी शंकरपुर स्थित महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जेल भरो आंदोलन करण्यात येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणविस यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना २४ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी अनेकदा आंदोलन करून विधानसभेचे कामकाज थांबविण्यास भाग पाडले होते.सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना २४ तास मोफत वीज पुरवठा करून थकीत वीजबील माफ करण्याचे सुतोवाच केले होते.एवढेच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वीज वितरण कंपनीच्या कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन करून तत्कालीन सरकार शेतकरी विरोधी असल्याच्या घोषणा देत जाहिर निषेध करत आमचे सरकार आल्यास २४ तास वीज पुरवठा करण्याचे आंदोलक शेतकऱ्यांना आश्वासीत केले होते.
माञ राज्यात सत्ता परिवर्तन होऊन शिंदे फडणविस सरकार स्थापन झाल्याला सहा महिण्याच्यावर कालावधी लोटला असुन तत्कालीन स्थितीत कृषी पंपाना १२ तास वीज पुरवठा करण्यात येत असताना लोडशेडिंग करून राञीच्या वेळी ८ तास वीज पुरवठ्याचा तुघलकी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे.हा निर्णय अतिशय अन्यायकारक असुन उभे धान पिक करपु लागल्याने शेतकरी पुरते बरबाद होण्याच्या मार्गावर आहेत.ही गंभीर बाब लक्षात घेता देसाईगंज तालुक्यातील कृषी पंपाना दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सुरळीत २४ तास वीज पुरवठा करण्या संदर्भात शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते छगन शेडमाके,नंदु नरोटे,पिंकु बावणे यांचा नेतृत्वात देसाईगंज महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत उर्जा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले होते.माञ करण्यात आलेल्या मागण्यांकडे सपशेल दुल॔क्ष करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जेल भरो आंदोलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी कळवले आहे.यास्तव शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.