तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न हाथ से हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ

 

देसाईगंज -येथील स्थानिक नैनपुर रोडवर असलेल्या गजानन महाराज मंदिर सभागृह येथे दि. 20 मार्च रोजी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने हाथ से हाथ जोडो अभियान या विषयावर महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रेचा टप्पा हात से हात जोडो अभियानाचा शुभारंभ देसाईगंज येथील गजानन महाराज मंदिर सभागृहातून करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार आनंदराव गेडाम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान, महाराष्ट्र प्रदेश कमीटी सचिव डॉ. नितीन कोडवते, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नंदू नरोटे, काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष आरिफ खा, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नितीन राऊत, जिल्हा परिषद आमगाव विसोरा गटाचे निरीक्षक टिकाराम साहारे, मनोहर नीमजे माजी सरपंच, गजनान सेलोटे उपसरपंच, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संजय करंकर, तालुका काँग्रेस कमिटी सचिव नानाजी कुथे, महेंद्र खरकाटे सचिव तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, युवक शहध्यक्ष विक्की डांगे, सेवादल तालुका अध्यक्ष दुशांत वाडगुरे, सेवादल शहर अध्यक्ष भिमराव नगराळे, मनोज ढोरे, पिंकू बावणे, माजी सरपंच विनायक वाघाडे, निलोफर शेख, रुपलता बोडेले सरपंचा आमगाव, जयमाला पेंदाम माजी जिल्हा परिषद सदस्य, ऋषीजी नाकाडे, विमल मेश्राम, ऋषींनी नाकाडे, आक्रोश शेंडे, युवराज वाघाडे, अमर बगमारे, भूषण साहारे, लालाजी दोनाडकर आदी काँग्रेस युवक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका काँग्रेस कमिटीचे महासचिव विलास बनसोड तर आभार जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस नरेंद्र गजपूरे यांनी केले.