बाजार विभागात न.प. देसाईगंज द्वारे बनविण्यात आलेल्या सुलभ शौचालयातील मुतारीला मोफत करा – युवक काँग्रेस ची मागणी

 

देसाईगंज :-
देसाईगंज नगर पालिकेने बाजार विभागात लाखो रूपये खर्च करून बाजार विभागातील नागरिकांच्या सोयी करीता सुलभ शौचालयाचे बांधकाम केले मात्र सदर सुलभ शौचालयात मुतारी करीता २ रू. दर आकारण्यात येत असल्याने मुतारीकरीता आकारण्यात येणारे २ रूपये न घेता मुतारीला मोफत करण्यात यावे, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक आणि मुख्याधिकारी न. प. देसाईगंज यांना निवेदनातून केलेली आहे.
युवक कॉंग्रेसने निवेदनात म्हटले की, नुकतेच देसाईगंज नगर पालिकेने बाजार विभाग, सब्जी मंडीतील भाजी विक्रेते व शेतकरी, जवळचे दुकानदान व शहरातील नागरिकांसाठी आरमोरी रोड वरील व्हेरायटी इलेक्ट्रीक जवळ जुन्या न.प. प्राथमिक शाळेच्या जागेवर लाखो रूपये खर्च करून सुलभ शौचालयाचे बांधकाम केले. व ते सुलभ शौचालय मागील महिन्यात नागरिकांकरीता सुरू करण्यात आले. परंतु सुलभ शौचालय सुरू झाल्यापासून तेथे मुतारी करीता जाणाऱ्यांची संख्या निम्म दिसत आहे. कारण त्या सुलभ शौचालयात आंघोळी करीता १० रूपये, संडासा करीता ५ रूपये तर मुतारीकरीता 2 रुपये शुल्क आकारणे सुरू केलेले आहे.
आंघोळ व संडासा करीता शुल्क घेत आहे त्याकरीता कोणालाच काही त्रास नाही. परंतु मुतारीकरीता जे २ रूपये घेत आहेत. त्यामुळे सामान्य व गोर-गरीब नागरिकांना तसेच बाजार विभागातील लघु व मध्यम व्यावसायिकांना ते परवडत त्यामुळेच त्या सुलभ शौचालयात पाहिजे तसे नागरिक, व्यावसायिक किंवा शेतकरी जाताना दिसत नाही.
तसेही बाजार विभागात आलेल्या प्रत्येक शेकऱ्यांकडून पालिकेने ठेका दिलेल्या कंत्राटदाराकडून बाजार पास म्हणून पैसे वसूल केल्या जाते. अश्यात त्या शेतकऱ्यांकडून सुद्धा २ रुपये आकारणे कितपत योग्य आहे. नगर पालिकेला उत्पन्नाचे अनेक साधन आहेत, परंतु नगर पालिका सुलभ शौचालयात मेन्टेनेसच्या नावाखाली जे मुतारीकरीता २ रूपये वसुल करीत आहे ते योग्य वाटत नाही.
सध्या पालिकेचे कारभार मुख्याधिकारी व प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी सांभाळत असल्याने आपण नागरिकांचा विचार करून मुतारीचे घेत असलेले 2 रूपये रद्द करून सुलभ शौचालयात मुतारीकरीता येणाऱ्यांना मुतारी मोफत करावी, जेणे करून सर्वसामान्य व शेतकरी वर्गाला याचा फायदा होईल अशी मागणी युकॉ निवेदनातून केलेली आहे.
यावेळी निवेदन देताना युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, शहर अध्यक्ष विक्की डांगे, तालुका सचिव आक्रोश शेंडे, तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव जगदिश शेंद्रे, महासचिव विलास बन्सोड, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अरुण कुंभलवार, नरेद्र गजपुरे माजी उपसरपंच, शिशुपाल वालदे, दिपेश रंधाये, मनिष सडमाके, जगदिश धांडे, संकल्प वासनिक, पवन खोब्रागडे, चांद बंसोड, अविनाश अनोले आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते.