काँग्रेसच्या आढावा बैठकीत जेष्ठ नेत्यांचा एकसुर
देसाईगंज-
काँग्रेस पक्ष सर्वांना घेऊन चालणारा पक्ष असुन देशाच्या स्वातंत्र्या पासुन ते विकासात्मक दृष्ट्या झेप घेण्यापर्यंत मजल मारून देशातील नागरिकांच्या हिताची कामे करणारा देशातील एकमेव सर्वात मोठा पक्ष असल्याचे स्पष्ट आहे.देशात जातीपातीच्या राजकारणात मताचे धृवीकरण करून सत्ता हस्तगत केल्या गेली असली तरी स्थानिक गावपातळीवर काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते सक्रिय असताना त्यांना बळ देण्याचे काम करण्यात न आल्याने पक्षात आपसी मतभेद वाढून गटातटाच्या राजकारणाला उत आले.ही गंभीर बाब लक्षात घेता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार स्थानिक कार्यरत कार्यकर्त्यांना बळ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असुन या माध्यमातून स्थानिक गावपातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करणे लक्ष असल्याचे मत काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी देसाईगंज येथील विश्रामगृहात आयोजीत पक्षाच्या आढावा बैठकीत व्यक्त केले.
देशाच्या राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जिएसटीच्या माध्यमातून गोरगरीबांना लुटण्याची प्रक्रिया थांबवून एककर प्रणाली लागु करण्याचे सुतोवाच केले आहे.सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करून ज्यांची जेवढी संख्या त्या प्रमाणात आरक्षण देणे,खाजगीकरण थांबवून सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकऱ्या उपलब्ध करून देणे,वाढलेली महागाई आटोक्यात आणुन शेतकरी, शेतमजुरांना यथायोग्य न्याय देणे,अग्नीविर योजना रद्द करून सैनिक भरती पूर्वीप्रमाणे लागु करणे,जुनी पेंशन ही कर्मचाऱ्यांच्या हक्काची असल्याने लागु करणे आदी लोकाभिमुख योजना राबविण्याचे जाहिर केले आहे.त्या अनुषंगाने काँग्रेस प्रणित छत्तीसगड, राजस्थान,हिमाचल प्रदेशात ह्या योजना कार्यान्वित करून प्रत्यक्षात लाभ दिल्या जात आहे.काँग्रेसची विचारधारा लोकाभिमुख असली तरी स्थानिक गावपातळीवर काँग्रेसचे पदाधिकारी,नेते पोहचुन संवाद साधल्या जात नसल्याने कट्टर काँग्रेसी पक्षापासुन दुरावलेत,ही अतिशय गंभीर बाब आहे.
देशात अलिकडे श्रीमंत- गरीब अशा दोन गटाच्या राजकारणाला सुरुवात करून अगदी नियोजन पद्धतीने बहुजनांना त्यांच्या न्यायीक हक्कापासुन वंचित ठेवल्या जात आहे.शैक्षणिक साहित्या सह खाण्या पिण्याच्या वस्तुवरही जिएसटी लावुन अक्षरशः जगणेही मुश्किल करून टाकले आहे.ही बाब सर्वांना समजत असली तरी वैचारिक लढाई लढण्यासाठी कुठलिच आस दिसत नसल्याने निराश झालेला बहुजन समाज गटातटात विखूरल्या गेला.परिणामी ६८ टक्के नागरीक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असताना सर्वाधिक प्रतिनिधी निवडून आणुन सत्ता काबीज करण्यात यशस्वी झालेत.माञ सत्ता हस्तगत करून बहुजनांच्या मुळावरच उठल्याने देशाच्या नागरिकांची आस असलेल्या पक्षाची धुरा सांभाळणे आता प्रत्येक काँग्रेसीची जबाबदारी झाली असुन यापुढे मतभेदाला बगल देत देशासाठी,देशातील नागरिकांसाठी काँग्रेसी विचारधारेच्या लोकांना जोडण्याचे काम युद्धस्तरावर सुरु करण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडी झालिच तर त्याही अनुषंगाने काम करण्याची तयारी असुन जर महाविकास आघाडी झाली नाही तर त्याही दृष्टीने नियोजन तयार असल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार स्थानिक गावपातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने आढावा बैठक असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीला काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी खासदार मारोतराव कोवासे,आदिवासी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.नामदेव उसेंडी,ओबीसी काँग्रेस कमिटीचे जेसा मोटवाणी,महाराष्ट्र प्रदेश महासचिव नामदेव किरसान, महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर,किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते श्याम धाईत,देसाईगंज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,पिंकु बावणे,नरेंद्र गजपुरे आदी जेष्ठ नेते प्रामुख्याने उपस्थित होते.