गडचिरोली/ प
सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय कनऀल बलबीर सिंह परमार यांच्या मौलिक विचार आणि मार्गदर्शनानुसार पत्रकारिता करित असतांना निर्भीडपणे वृत्त लेखन करणारे चक्रधर मेश्राम यांची सैनिक समाज पार्टीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी तर प्रकाशसिंग बंडवाल यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
अनेक वर्षांपासून समाजसेवा करित असल्याने जनमानसात त्यांनी लोकप्रियता मिळविली आहे. सैनिक समाज पार्टीचे माध्यमातून ध्येय- धोरण , विकास योजना, संविधानिक मुलभूत हक्क आणि अधिकार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी , समाजातील सुशिक्षित, ईमानदार देशभक्त टॅलेंटेड नागरीकांचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल सैनिक समाज पार्टीच्या सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रस्तापीत घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांना हरविण्यासाठी रितसर आखणी करून निवडणुकीत खंबीरपणे पाय रोवून विजयी होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुकीत उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने कंबर कसली जाणार आहे. बेहिशेबी मालमत्ता धारकांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सैनिक समाज पार्टी तर्फे सर्वसमावेशक लोकशाही पद्धतीने निवडणूकीच्या रिंगणात उमेदवार उभे करण्यात येणार आहे.
सैनिक समाज पार्टीच्या कार्यातून गावपातळीवर विकासाच्या दृष्टीने विविध प्रकारच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करून आणि आढावा बैठका घेऊन तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात सर्व स्तरावर पदाधिकाऱ्यांची निवड करून संघटन करण्यात येणार आहे.
सैनिक समाज पार्टीत महाराष्ट्रातील प्रत्येक घरा- घरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल बलबीर सिंह परमार , कृषी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्रीधर दरेकर , कमांडो ईश्वर मोरे, प्रदेशाध्यक्ष एड. शिवाजी डोळे , युध्दविर कॅप्टन अरुण कदम, महिला प्रदेशाध्यक्ष सुनीताताई झिंजुरडे, राष्ट्रीय फिल्म इंडस्ट्री प्रमुख जिवन कोल्हे, प्रदेश सचिव अरुण खाली , कार्याध्यक्ष तुकाराम डफळ, सुभेदार खंडारे आदीसह महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांनी केलेले आहे. सध्याच्या राजकारणात असलेली अस्थिरता लक्षात घेऊन तसेच राजकारणात अराजकता माजविणाऱ्या, गुंडगिरी प्रवृत्तीच्या, भ्रष्टाचारी, प्रवृत्तीच्या उमेदवारांना त्यांची खरी जागा येणाऱ्या निवडणुकीत दाखवून दिली पाहिजे . सैनिक समाज पार्टीच्या
माध्यमातून , प्रस्तापीत घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांना हरविण्याचा पराक्रम फक्त सैनिक समाज पार्टी करणार आहे. त्यासाठी प्रत्येक गाव, तालुका, शहर प्रत्येक जिल्हास्तरावर मोठे संघटन तयार केले जात आहे
त्यासाठी महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेंनी सैनिक समाज पार्टीत सामील होण्याची गरज आहे. असे आवाहन जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांनी केले आहे.