वृक्षांची लागवड करणे गरजेचे – चहांदे

 

 

देसाईगंज:-

पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हासाने निसर्ग चक्र बदलत चालले आहे. त्याचे दुष्परिणाम पुढील पिढीस भोगावे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे असे उद्गार युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे यांनी वृक्षलागवड करतांना काढले.

दि. ९ जुलै २०२३ ला युकाँचे तालुका अध्यक्ष पंकज चहांदे यांचा वाढदिवस गांधीनगर येथील महात्मा फुले युवा मंच यांच्या वतीने साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान गावातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक, शिवाजी चौक, हनुमान मंदिर जवळ, विठ्ठल रूक्मिनी मंदिर जवळ, जि. प. शाळा परिसरात व मुख्य मार्गावर वृक्षारोपन करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करण्यात आले. यावेळी महात्मा फुले युवा मंच तर्फे त्यांना महात्मा फुले यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महात्मा फुले युवा मंचचे अध्यक्ष नवनाथ जेंगठे, तालुका कॉंग्रेसचे सचिव दत्तात्रय लेनगुरे, गांधीनगरचे उपसरपंच नेताजी सोंदरकर, ग्रा.पं. सदस्य रामचंद्र नखाते, करीश्मा सोंदरकर, युकॉचे सरचिटणीस प्रशांत मैंद, कोषाध्यक्ष विनोद चंडिकार, मनोहर जेंगठे, संजय पिसे, हंसराज साखरे, प्रेमदास सांगोळे, जितेंद्र कुथे, मधूकर बावणे, देवानंद वाडगुरे, हिरालाल भुसारी, चंद्रपाल भुरके, गोपाल वाढई, राजकुमार गावतुरे, अशोक चौधरी, कैलास चंडीकार, जयेश धांडे, विशाल भुरके, रोहित मोहुर्ले, प्रितम ढोरे, आदित्य दोनाडकर, अक्षय चंडीकार, कार्तिक कांबळी, तेजस राऊत, प्रणय राऊत, चेतन आदे, आशिष शेंडे, नितेश कांबळी, आशिष जेंगठे, प्रेमानंद कावळे, सुधीर आदे, धिरज मोहुर्ले, नंदकिशोर वाडगुरे तसेच युवा मंच व युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.