कलापथक पथनाट्यातून कोविड १९ विषयी जनजागृती

…. जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय गडचिरोली व मानव विकास बहुउद्देशिय कला मंडळ चूरमुरा यांच्या संयुक्त माध्यमातुन देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांत कलापथक व पथनाट्यातुन कोविड १९ संसर्गविषयी जाणीव जागृती करण्यात आली. शासकिय योजनांची माहिती नागरिकांना देऊन जनजागृती करण्यात आली.

कलापथक मंडळाचे अध्यक्ष तथा कलावंत लोकशाहीर विजय शेंडे व त्याच्या संचाने पथनाट्य, गीते, व संवाद कार्यक्रमातून विविध शासकिय योजनांचा जागर केला. यात सुधाकर भोयर, सोमंनाथ मानकर, तुळशीराम उंदीरवाडे, कुमदेव बोरकुटे, श्यामराव कुकुडकर, आशीष लोणारे, लोपा शेंडे, रागिणी रंगारी आदी कलावंतांनी सहभाग घेतला होता.