आरमोरी- स्थानिक नगर परिषदेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले आहे. घरकूल लाभार्थीची आर्थिक स्थिती लक्षात घेता त्यांना घरकूल बांधकामासाठी मोफत रेती उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी तालुका कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आवास योजनेअंतर्गत घरकूल मंजूर करण्यात आले आहे. याअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम हाती घेतले आहे. मात्र आजच्या महागाईच्या काळात अल्पशा अनुदानावर घराचे गरीब लाभार्थ्यांना रेती खरेदी करणे जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे त्यांचे हक्काचे घर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे प्रशासनाद्वारे या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी मोफत रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष शालीकराम पत्रे यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी निवेदन सादर बांधकाम करणे फारच कठीण होऊन करताना बबन शिलार, दिलीप बसले आहे. सद्यस्थितीत रेतीचे दरही कोकोडे, दिगांबर बुल्ले, अजय चटारे, अवाढव्य वाढले आहे. यामुळे या सामृतवार आदी उपस्थित होते.