वैश्विक कल्याणासाठी वैश्विक विज्ञान ही प्रक्रिया एक दिवसा करीता मर्यादित न ठेवता निरंतर चालू ठेवा प्रा.डॉ. के. टी. किरणापूरे यांचे प्रतिपादन.

 

मराठी विज्ञान परिषद आरमोरी याच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन हितकारणी कनिष्ठ महाविद्यालय आरमोरी येथे साजरा

आजच्या विज्ञान युगात विज्ञानवादी मानवांनी वैश्विक विज्ञान ही प्रक्रिया एक दिवसा करीता मर्यादित न ठेवता निरंतर चालू ठेवावी असे प्रतिपादन मराठी विज्ञान परिषदेचे आरमोरी विभाग प्रमुख प्रा.,डॉ. के.टी.किरणापुरे यांनी केले ते आरमोरी येथील हितकारणी कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मराठी विज्ञान परिषद अध्यक्ष आरमोरी प्रा. डॉ. के. टी . कीरणापुरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य ,डॉ. आशिष सेलोकर , प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य ,रामा पाचपांडे , सत्कारमूर्ती चारुदत्त राऊत – अध्यक्ष स्वयं रक्तदाता समिती जिल्हा गडचिरोली. देवानंद दूमाने सर्पमित्र व अध्यक्ष -वृक्षवली व वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी , राऊल जुआरे अध्यक्ष युवारंग बहू उद्देशिय संस्था आरमोरी, व राजुजी घाटूरकर अध्यक्ष – राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रूप यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ . सुनिल चौधरी, चेतन ठाकरे ,दुलाराम किरणापुरे , श्याम बहेकर ,दूर्वास बुद्धे , रजनी किरणापुरे , प्रणाली गारोदे , प्रा. मीना उपाध्ये व शाळेतील शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी , नागरीक व वर्ग ७ ते ११ वी चे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले डॉ. आशिष सेलोकर यांनी थोर वैज्ञानिक डॉ. सी.व्ही.रमण यांच्या कार्याचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी मराठी विज्ञान परिषद आरमोरीच्या वतीने घेण्यात आलेल्या वन्यजीव संरक्षण शाळा पोस्टर स्पर्धा या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. कुमुदिनी माकडे हीने पटकावले तर द्वितीय क्रमांक कु. तनुजा चौधरी तर तृतीय क्रमांक प्रिन्स पत्रे ह्याने प्राप्त केले तर गणित ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक सौरव हेडाऊ तर द्वितीय क्रमांक कु. हिमानी ढोरे तर तृतीय क्रमांक कु.वैष्णवी जुवारे हीने प्राप्त केले. विज्ञान प्रतिकृती रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. काव्या ठवकर, द्वितीय क्रमांक पंकज कोलते, तृतीय क्रमांक कु.सोनल बोडणे हीने प्राप्त केले तर प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून कु.चेतना निखारे हीची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरेश बावनकर यांनी केले तर प्रास्ताविक सतीश धात्रक व आभार चेतन भोयर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य नितीन कासार, बालकदास कोटरंगे ,रंजना गौतम ‘ गौरी जौंजालकर , जयश्री सोनकर, कु.हिमानी किरणापुरे यांनी सहकार्य केले.