पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त डोंगरगावात चित्रकला व रांगोळी स्पर्धा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा उपक्रम… शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी

 

आरमोरी….. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय आरमोरीच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगरगाव भु. येथे चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यानिमित्ताने पौष्टिक तृणधान्या विषयी जनजागृती व्हावी तसेच मुलांमध्ये तृणधान्य विषयी माहिती उपलब्ध होण्याचे दृष्टीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगरगाव भु. येथे तालुका कृषी अधिकारी आरमोरी च्या वतीने विविध गटांमध्ये चित्रकला तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उपसंचालक तथा प्रकल्प उपसंचालक आत्मा गडचिरोली आबासाहेब धापटे, हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका कृषी अधिकारी कु. जे व्ही घरत, जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा डोंगरगाव भुसारी येथील केंद्रप्रमुख सौ. नलिनी शेडमाके, मुख्याध्यापक आर. के. सोमनकर, पदवीधर शिक्षक पी.डी.बोरकर, विषय शिक्षक एस.ए. मेश्राम, सहाय्यक शिक्षक कु.एस. वाय. चापले, डब्ल्यू.टी. गेडाम, एन. जे. भोगे, के.डी. मेश्राम, कृषी पर्यवेक्षक व्ही. एम. शेंडे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेंद्र दोनाडकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. घरत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन कृषी सहाय्यक वाय. एच.सहारे यांनी केले. तर आभार कृषी पर्यवेक्षक ए. आर.हुकरे यांनी मानले. रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कृषी सहाय्यक एन. सी. कुंभारे, कु. एस. एम. शंभरकर, कु.व्ही. आर. वाढई यांनी अथक परिश्रम घेतले.