लाखो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या गौतम अदानी व त्यांचे मित्र देशाचे प्रधानमंत्री यांना वाचविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी व गोदी मीडिया करीत आहे – डॉ. नामदेव किरसान

दिनांक 1 मार्च 2023 रोजी ग्राम चांभार्डा ता. जि. गडचिरोली येथे “अन्याय” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी हिडनबर्ग अहवालाने उघडकीस आणलेल्या अडाणी ग्रुप कंपन्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल मोदी सरकारला धारेवर धरले. याबाबत प्रेक्षकांना अवगत करताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांचे मित्र गौतम अदानी यांनी त्यांच्या कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या किंमती कृत्रिमरीत्या कितीतरी पटीने वाढवून त्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा निगम, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर राष्ट्रीयकृत बँका कडून हजारो कोटी रुपये घेऊन गुंतविले. हिडनबर्ग यांनी ही बाब उघडकीस आणल्यावर अदानी ग्रुप कंपन्यांच्या भाग भांडवलाच्या किंमती झपाट्याने खाली घसरल्या. अशा रीतीने प्रधानमंत्र्यांचे मित्र गौतम अदानी यांनी एल. आई. सी. व राष्ट्रीयकृत बँकांना हजारो कोटीचा गंडा घातला. याबाबत लोकसभेत काँग्रेस नेते राहुलजी गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर त्यावर प्रधानमंत्री अवाक्षर ही न बोलता फफोलेबाजी करीत राहिले. प्रधानमंत्री व भारतीय जनता पार्टी गौतम आदानींना वाचविण्याचा भरपूर प्रयत्न करीत आहेत. हा हजारो कोटी रुपये घेऊन सार्वजनिक उपक्रमांना लुटण्याचा प्रकार असल्याचे सांगत येणाऱ्या काळात या सर्व बाबींचा विचार करूनच मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी युवक काँग्रेसचे अतुल भाऊ मल्लेलवार, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विश्वजीत कोवासे, माजी तालुकाध्यक्ष नेताजी गावतुरे, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, पत्रकार प्रल्हादजी मशाखत्री यांनी मार्गदर्शन केले. मंचावर अजा विभाग जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष दिवाकरजी निसार, नितेश राठोड, सरपंच शुभम उईके, उपसरपंच संदीप अलबनकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश ठाकरे, प्राध्यापक गभणे, भोयर गुरुजी, ठाकरेजी, पोलीस पाटील अश्विनीताई मेश्राम, अर्चनाताई कोटगले, संतोष मशाखत्री, गेडामजी ग्रामसेवक व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.