——————————————————————
गडचिरोली:-राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र जी फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनीद्वारे बेमुदत उपोषण करणाऱ्या सेवकांच्या मागण्या अवगत करुन दिले असता मागण्या लवकरच पुर्ण करण्याच्या आश्वासना नंतर खासदार श्री अशोकजी नेते, राष्ट्रीय महामंत्री, भाजपा जनजाती मोर्चा, बेमुदत उपोषण करणाऱ्या विज ग्राम सेवकांशी संवाद साधुन त्याना लिंबुपाणी पाजून उपोषणाची सांगता केली
गडचिरोली जिल्ह्यात पेसा अंतर्गत सन २०१६-१७ पासून २०२१-२२ पर्यंत ग्राम विज सेवकांना १ दिवसाचा खंड देवुन ग्राम पंचायत परिसरात उद्भवणाऱ्या विज पुरवठ्यातील दुरुस्ती करण्यासाठी १५६ बेरोजगार युवकांना नियुक्ती देण्यात आली होती.महाराष्ट्र राज्य विज नियामक आयोगाच्या आदेशानुसार सदर कालावधी ५ वर्षाचा असल्याने सन २०२२-२३ या वर्षी महावितरण कंपनी कडून त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे १५६ यूवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी गडचिरोली येथील अधिक्षक अभियंता, महावितरण कंपनी यांच्या कार्यालयासमोर मा.नंदुभाउ नरोटे सरसेनापती आविस यांच्या नेत्रुत्वात आंदोलन सुरू केले होते
उपोषण मंडपात खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे श्री अशोकजी नेते, प्रदेश संघटन सरचिटणीस,भाजपा एस.टि मोर्चाचे प्रकाशजी गेडाम, श्री नंदुभाउ नरोटे,सरसेनापती आविस,जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,भाजपा सोशल मीडिया संयोजक गडचिरोली जिल्हा आनंद खजांची विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता डोंगरवार साहेब,अतिरिक्त कार्यकारी अभियंता डि.बी.कुंमरे साहेब,तसेच उपोषणाला बसणारे अध्यक्ष,सचिव व उपोषण कार्यकर्ते उपस्थित होते*