रोहयो कामाची तिन महिन्यापासुन मजुरी थकली..मजूर आर्थिक विवंचनेत. मजुरी तात्काळ द्या. माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी केली रोहयोच्या प्रधान सचिवाकडे मागणी.

आरमोरी…..गडचिरोली जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आरमोरी, कुरखेडा, कोरची व इतर तालुक्यात डिसेंबर महि्यापासून केलेल्या विविध कामाची मजुरी मजुरांना गेल्या तिन महिन्यापासुन देण्यात न आल्यामुळे मजूर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळें रोहयो कामाची मजुरी तात्काळ देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी राज्याचे प्रधान सचिव रोहयो यांच्याकडे केली आहे.

गडचिरोली जिल्हयात रोजगाराचे कोणतेही साधन नसल्याने रोहयोच्या माध्यमातूनच ग्रामीण भागातील लोकांना थोड्याफार प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतो. रोहयोच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम मिळावे व केलेल्या कामाची मजुरी पंधरा दिवसात मिळावी अशी तरतूद योजनेत करण्यात आली आहे. रोहयो अंतर्गत शेततळे, तलाव खोलीकरण, भातखाचर, पांदन रस्ते, बोळी खोलीकरण, नहर घरकुलसह विविध कामे ग्रामपंचायत स्तरावर रोहयो तून केली जातात.. शासनाची योजना चांगली आहे .मात्र सदर योजना राबविणारी यंत्रणा व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे केलेल्या कामाची मजुरी मजुरांना वेळेवर मिळण्यास दिरंगाई होत असल्याने मजूर वर्ग आर्थिक विवंचनेत सापडला आहे.
घरकूल बांधकामासाठी सुध्दा रोहयो तून निधी दिला जातो मात्र घरकूल लाभार्थ्यांना सुध्दा निधी देण्यात आला नाही .त्यामुळे घरकुल बांधकामावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळें घरकुलाचे बांधकाम सुध्दा रखडले आहेत.

होळीचा सण येऊनही रोहयो अंतर्गत केलेल्या कामाची मजुरी मजुरांना देण्यात आली नाहीं त्यामुळें शासन प्रशासनाच्या कार्य प्रणाली विषयी मजुरमध्ये नाराजी चा सूर उमटत आहे. डिसेंबर महि्यापासून केलेल्या रोहयो कामाची मजुरी देण्यात आली नसल्याची बाब मजुरांनी माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या निदर्शनास आणून दिली. सदर बाबीची दखल घेऊन माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी राज्याचे प्रधान सचिव रोहयो यांच्याकडे तिन महिन्यापासुन मजुराची थकलेली मजुरी तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केली आहे.