सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांनी आपसात कोणताही भेद न करता समतेचा विचार अंगीकारून समाजात सलोखा टिकवून ठेवणे ही काळाची गरज – डॉ. नामदेव किरसान.

दिनांक 10 मार्च 2023 रोजी मौजा खेडेगांव (राणी) ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथे सार्वजनिक नाट्य मंडळ खेडेगांवच्या वतीने आयोजित “कट्यार काळजात घुसली” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान आणि त्यांच्या उद्घाटकीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचे महत्व विशद करतांना सांगितले की, शिवाजी महाराजांनी स्वराज्यात समता व बंधुता प्रस्थापित करण्याचे काम केले. धर्माधर्मामध्ये जातीपाती मध्ये व कोणत्याही पंथांमध्ये वा स्त्री-पुरुषांमध्ये कोणताही भेद न करता सर्वांना समान संधी व समान न्याय देण्याचे काम केले. हाच समतेचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता बंधुता स्वतंत्रता सहिष्णुता व धर्मनिरपेक्षता या बाबी भारतीय संविधानात विहित केल्या. संविधानाचे पालन करणं आपण सर्वांचं कर्तव्य आहे. करिता जाती धर्म व पंथामध्ये कोणताही भेद न करता सर्वांनी सलोख्याचे जीवन जगणे हे अभिप्रेत आहे. या भारतीय संविधानाच्या तरतुदींचे पालन करून व्हाट्सअप प्रसारमाध्यमे व टेलिव्हिजन वरील अपप्रचाराला बळी न पडता आपसात कोणताही भेद न करता जातीय व धार्मिक सलोखा टिकवून ठेवावा अशी विनंती त्यांनी प्रेक्षकांना केली.
याप्रसंगी नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे, माजी आमदार आनंदरावजी गेडाम, माजी न्यायमूर्ती ज्ञानदेवजी परशुरामकर, सत्कारमूर्ती माजी आमदार हरिरामजी वरखडे, राकाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ लांजेवार, भा ज यु मो चे चांगदेवजी फाये यांनी मार्गदर्शन केले. मंचावर माजी सभापती परसरामजी टिकले, माझी जि प उपाध्यक्ष तथा तालुका काँग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट, माजी नगरसेवक गणेशजी फाफट, रजनीकांतजी मोटघरे, माजी जि प सदस्य प्रभाकरजी तुलावी, दिनुजी भट्टड, माजी तालुकाध्यक्ष जयंत पाटील हरडे, इंदुरकर सर, गिरीधरजी तितराम, अयुब खान पठाण, रवींद्रजी गोटेफोडे, माजी उपसभापती नितीनजी राऊत, दामोदरजी अंबादे, चांगदेवजी सोनकुसरे, किशोरजी तलमले, पिंकुजी बावणे, शामिनाताई उईके, हरिश्चंद्रजी डोंगरवार, माणिकजी नाकाडे, मारगायेजी, धर्मदासजी उईके व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.