एक मुल एक झाड’ कोरची आश्रम शाळेत वृक्षारोपण

 

कोरची

शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांचे मार्गदर्शनाखाली शाळेच्या परिसरात ‘एक मुल एक झाड’ आणि झाडांचे जीवनातील महत्त्व लक्षात घेता. विद्यार्थी व शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी शाळेतील प्रा.रमेश रामटेके, प्रा.हरेश कामडी, प्रा.परेश मेश्राम, प्रा.अरुण कायंदे, प्रा.अभिमन्यू वाटगुरे,प्रा.भारत बहादूरे, जेष्ठ माध्यमिक शिक्षक भैयालाल कुरसंगे,संतोष सहारे,सुषमा अंबोने,लीना वाटगुरेव,शेषराजजी शेंडे,अधिक्षका शिमा कुरेकार,निलमचंद कापगते,अश्विनी कापगते, भारती चौधरी, दीक्षा टेम्बुर्णे,निखिल दाणी, मिलिंद पिलारे व विद्यार्थी उपस्थित होते.