तुतेकनार गावातील शेतकऱ्याची विष प्राशन केल्यामुळे मृत्यू

 

 

कोरची

कोरची तालुक्यापासून 13 किलोमीटर अंतरावर येत असल्या तूतेकणार गावातील एका शेतकऱ्याने ५ जुलैला दुपारून राहत्याघरी विष प्राशन केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सनकु मंगलू कोरेटी (वय५१) रा. तुतेकनार असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मृतक शेतकरी याच्या मुलगा निलेश सनकु कोरेटी (वय१९) यांनी सांगितले की, वडील सनकु यांना दारू पिण्याची सवय होती ते मागील तीन महिन्यापूर्वी मोटरसायकल वरून पडून त्यांचा अपघात झाला होता तेव्हापासून ते पोटाचा त्रास होत आहे असे म्हणत होते. तर ०५ जुलैला सकाळी ८ वाजता पत्नी अमरोबाई, मुलगा निलेश व बहीण अनिता हे शेतीवर शेतीच्या कामाने गेले होते. सनकु हे घरी एकटेच होते. अंदाजे दुपारी बाराच्या सुमारास शेतावरून घरी सगळे आल्यावर पाहिले की वडील घरातील छपरीमध्ये खाटेवर झोपून होते व त्यांच्या तोंडातून फेस निघाल्याचे दिसून आले त्यांना हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते काहीच हालचाल करत नव्हते.

त्यामुळे तात्काळ कोरची येथील नातेवाईक होळी यांना फोन करून त्यांची कार मागून त्यांच्या कारमध्ये तीन वाजता सुमारास मुलाने कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात आणले रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल राऊत यांनी बघितले तर त्यांचे काहीवेळा पुर्वीच मृत्यू झाले असल्याचे सांगितले. मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट असल्याने आत्महत्या केले कि नाही असे सांगता येणार नाही. सदर घटनेबाबत कोरची पोलीस स्टेशन मध्ये मार्ग दाखल करण्यात आल्या असून पुढील तपास पोलीस अधिकारी गणेश फुलकवर यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलीस करित आहेत.