कोरची
जेवणात पोळ्या बनवणार की नाही म्हणून पतीने-पत्नीला विचारले पत्नीने बर नाही मला उशिरा बनवणार म्हणताच पतीने रागात येऊन लाकडी कोरपाटनी पत्नीच्या डोक्यावर वार केले, केसा पकडून खाली आपटले यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना कोरची तालुक्यातील नांदळी येथे सोमवारी (३ जुलै) सायंकाळ दरम्यान घडली. तर कोरची तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी कोरची तालुक्यातील कोचीनारा गावातील एका पतीने घरगुती वादातून आपल्या पत्नीला कुऱ्हाडीने मारून जीवे मारले.
अनिता संपत हलामी (वय३५) रा. नांदळी असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. २ जुलैला पतीसोबत अनिता माहेरी सोहले येथे मुक्काम करून ३ जुलै ला दुपारी दीड वाजता दरम्यान सासरी नांदळी गावला भाऊ संजय काटेंगे व पती संपत हलामी सोबत परत आली होती. पती व भाऊ संजय हे दोघेही बाजार करण्यासाठी घराबाहेर गेले आणि बाजार करून साडेचार वाजता सुमारास पती एकटेच घरी आले. तब्येत बरी नसल्याने पत्नी अनिता आराम करत होती तेव्हा आरोपी पती संपत वासुदेव हलामी (वय४५) पत्नीला जेवणात पोळ्या केले का म्हणून विचारले. पत्नी म्हणाली माझी तब्येत बरी वाटत नाही थोड आराम करून स्वयंपाक करते अशी म्हणाली तेव्हा पतीने घरातील लाकडी कोरपटाने डोक्यावर मारून केस पकडून खाली आपटले.
त्यामुळे पत्नी अनिता च्या डोक्याला डाव्या कानाच्या वर मार लागून रक्त निघू लागले पत्नी रडायला लागली त्यावेळी पतीने घरातच थांब घराबाहेर निघू नको असे पत्नीला म्हणत होते परंतु पत्नी रक्ताने भरली म्हणून धावत गावातील सिस्टर कडे गेली. पती सुद्धा तिच्या मागे मागे गेला यावेळी गावातील सुभाष कल्लो मावशी फुलमा व इतर लोक आले तेव्हा सिस्टर मावशी फुलमा यांनी कशाला मारले असे पतीला विचारले असता काहीच न बोलता तिथून पती संपत निघून गेला. यावेळी सिस्टर ने प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी असल्यामुळे रुग्णवाहिका बोलावुन कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठवले. रुग्णवाहिकेत पत्नी एकटीच रुग्णालयामध्ये आली व येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे.
आरोपी पती संपत वासुदेव हलामी (वय४५) याच्यावर कोरची पोलीस स्टेशन येथे कलम ३२४ अनवे गुन्हा दाखल झाला असून कोरची पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर बारसागडे हे अधिक तपास करत आहेत.