आज दिनांक 12 जुलै 2023 ला गट साधन केंद्र कोरची येथे समग्र शिक्षा अभियानातील काम करणारे करार कर्मचारी यांनी एक अनोखा उपक्रम राबवून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी,आपल्या मागण्या शासनास सादर करण्यासाठी निवेदन दिले.
समग्र शिक्षा अभियान करार कर्मचारी महाराष्ट्र राज्य कृती समिती जिल्हा गडचिरोली तर्फे आज संपूर्ण जिल्ह्यात संविधानाची उद्देशिकेचे वाचन करून अनोखा उपक्रम साजरा केला .समग्र शिक्षा या केंद्रीय योजनेत राज्यातील 6500 कंत्राटी कर्मचाऱ्याना मागील 6 वर्षांपासून वेतनवाढ देण्यात आलेली नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.परंतु या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.अत्यंत हलाखीच्या परिस्थिती तुटपुंज्या मानधनावर करार कर्मचार्यांना जगावे लागत आहे. या महत्वपूर्ण बाबीकडे राज्य कार्यालय व शासनाचे लक्ष केंद्रित करन्यासाठी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.त्यात प्रामुख्याने कंत्राटी कर्मचाऱ्याना शासकीय सेवेत नियमित करणे,वेतनश्रेणीसह वेतनवाढ करणे, मागील सहा वर्षातील थकबाकी अदा करणे,मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून त्याच्या वारसास नोकरी प्रदान करणे,वैदयकीय सोयी सुविधा प्रदान करण्याची मागणी शासनास या निमित्याने करण्यात आली.सदर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन गट साधन केंद्र कोरची येथील पटांगणात उभे राहून वाचन करण्यात आले.या वेळी कार्यालयातील सर्व कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.