बेडगाव पोलीस मदत केंद्रात पोलिसांनी घेतला ४० विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर

 

 

कोरची

गडचिरोली पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बेडगाव पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रबोधन जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गुरुपवार यांच्या उपस्थितीमध्ये पोलीस मदत केंद्र बेडगाव येथे गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन, पोलीस दादारोला खिडकी, यशोरथ टेस्ट सिरीज मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उड्डाण” अंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बेडगाव परिसरातील ४० विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षा सराव पेपर १५ जुलै शनिवारी दिला आहे.

दोन महिन्यापूर्वी पोलीस मदत केंद्र बेडगाव येथील अधिकारी, अमलदार तसेच एस आर पी एफ चे पोलीस अंमलदार यांनी स्वखर्चाने व श्रमदानातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “सार्वजनिक वाचनालय” स्थापन करण्यात आले होते. याच सार्वजनिक वाचनालयात विद्यार्थी अभ्यास करत असतात म्हणून त्यांना त्यांच्या अभ्यासाची उजळणी व्हावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दल व पोलीस मदत केंद्र बेडगावच्या वतीने ४० विद्यार्थीचे स्पर्धापरीक्षेचा सराव पेपर घेतला आहे. सराव पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे मत विचारले असता त्यांनी गडचिरोली पोलीस प्रशासन व पोलीस मदत केंद्र बेडगावचे आभार मानले. सराव पेपरच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराची व्यवस्था पोलिसांनी केली होती.