निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक गटाशी संवाद

 

कोरची

जिल्हा परिषद शाळा रामसायटोला येथे 5 आगस्ट शनिवार ला निपुण भारत अभियान अंतर्गत माता पालक सभा सौ. श्यामबाई पोरेटी यांचे घरी संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापिका निलोफर काजी यांनी सर्व मातांचा पुष्पहार देऊन स्वागत केले.

दरम्यान निपुन भारत अभियान बाबतीत प्रथम चर्चा करून महत्त्व सांगण्यात आले. देशातील विद्यार्थ्यांमध्ये मुलभूत साक्षरता आणि संख्यात्मक कौशल्ये निर्माण करणे हा या निपुण भारत मिशन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आहे, या योजनेच्या माध्यमातून 2026 ते 27 पर्यंत देशातील प्रत्येक मुलाला इयत्ता तिसरी च्या अखेरीस लेखन आणि वाचन व अंक गणित स्पष्टपणे समजण्याची क्षमता विकसित करणे, पालक मातांच्या मदतीने मुलांचा शारीरिक, बौद्धिक, विकास करणे होय, यामध्ये विविध टॉस, विविध गेम च्या माध्यमातून प्रत्येक्षित करून दाखले देऊन सांगितले गेले. उदाहरणात धारदार वस्तूची काळजी कशी घेतली जाणार याचं प्रात्यसिक करून दाखवले यामुळे दैनंदिन जीवनात मुलांना आणि पालकांना पण फायदा होईल. त्याचप्रमाणे प्रात्यसिक म्हणून मातांना घड्याळाचा वर्कशीट देऊन विविध रंगाने रंगऊन घेण्यात आले तसेच प्रात्यसिक घरी मुलांसोबात करण्यात सांगितले.

रामसायटोला येथील मुख्याध्यापिका काजी यांनी माता पालक गटांची सभा यशस्वी करण्यासाठी, पालक शाळेत येऊ शकत नाही तर आपण पालकांपर्यंत जाऊन गटागटाने सभा घेऊन उद्देश पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.