बोटेकसा येथे निःशुल्क आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ

 

कोरची

नागरिकांनी निरोगी आरोग्यासाठी सर्व व्यसनाचा त्याग करून आपले आरोग्य जपावे जेणेकरून योग्य रितीने आपला जिवन व्यतीत करता येईल असे प्रतिपादन बोटेकसा येथिल नि:शुल्क भव्य आरोग्य शिबीराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित शेकडो नागरिकांना कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी केला. तर अध्यक्ष स्थानावरुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी नागरिकानी वैयक्तिक स्वच्छता कसी ठेवावी या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

बोटेकसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे निःशुल्क आरोग्य शिबीराचे १४ आगष्ट ला आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांचा लाभ प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा परिसरातील शेकडो रुग्णांनी घेतला. सदर शिबिरांचे उद्घाटन तहसीलदार प्रशांत गड्डम यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून किशोर नरोटे सरपंच ग्रामपंचायत बिहिटेकला, मनोज बेलवाती पोलिस पाटिल बोटेकसा, डॉ प्रणव लेपसे वैघकिय अधिकारी बोटेकसा, नयन कांटगे सचिव ग्रामपंचायत बिहिटेकला, राहुल अंबादे सामाजीक कार्यकर्ता तालुका कोरची हे उपस्थित होते.

या शिबिरात रुग्णांची तपासणी करिता डॉ. निखिल चव्हाण बालरोग तज्ञ, डॉ. अखिलेश कांबळे अस्थिरोग तज्ञ, डॉ. अस्विन मेश्राम बालरोग तज्ञ, डॉ. नंदकुमार माडाकोळीकर स्त्रीरोग तज्ञ, डॉ. पंकज कामेंलवार व मनोहरे नेत्र चिकित्सक हे उपस्थित होते. सदर शिबिर हे प्राथमिक आरोग्य केंद्र बोटेकसा अभिज्ञान फाउंडेशन नागपूर ग्रामपंचायत बिहिटेकला व काही व्यक्तीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.

या शिबीरात अस्थिरोग १६७, बालरोग ९१, गर्भवती माता १४३, नेत्र चिकित्स ४०, जनरल ८५ व इतर रुग्ण २७ अशा एकूण ५५३ रुग्णांची तपासणी करण्यात आली. गंभीर स्वरूपानी ईजा झालेल्या रुग्णाचे ग्रामीण रुग्णालय कोरची येथे क्ष-किरण तपासणी करून उपचार करण्यात आले. तसेच नेत्रचिकित्सा मध्ये बाधित रुग्णांना २५ तारिखेला शस्त्रक्रियेसाठी बोलविण्यात आले आहे. सदर शिबिर अतिदुर्गम भागात पहिलादाच सेवाभावी वृत्तीने झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. सदर शिबिराचे प्रस्तावना व संचालन प्रमोद सानपुते यांनी केले तर शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ चौधरी, डॉ ज्ञानदीप नखाने तसेच सर्व समुदाय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी यांनी मदत केली आहे.