पल्लवी बन्सोड हीची संगीत विद्यालय खैरागड येथे निवड झाल्याबद्दल सत्कार.

कोरची
येथील पारबताबाई विद्यालयात 2015 पासून 2020 पर्यंत पाचव्या वर्गापासून दहाव्या वर्गापर्यंत शिक्षण घेणारी कु. पल्लवी बन्सोड रा. तेकाबेदळ ता. कोरची या विद्यार्थीनीने इंदिरा गांधी संगीत विद्यालय खैरागड या देशातील नामांकित विद्यालयात प्रवेश मिळवली. तीचा विषय आहे हिंदूस्थानी व्होकल म्हणजे राष्ट्रीय संगीत शास्त्र या विषयावर ती शिक्षण घेणार आहे. या संगीत विद्यालया मधून आजवर बरेच गायक, वादक आणि सिनेमा जगताशी संबंधित कलाकार निघून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे.
अशा नामांकित विद्यालयात पल्लवीची निवड झाल्याबद्दल त्या विद्यार्थीनीचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पल्लवीची आवड संगीतात आहे हे ओळखून शाळेचे मुख्याध्यापक शालीकराम कराडे यांनी तालुका स्तरावर होणाऱ्या विविध संगीत स्पर्धेत तीला पाठवीत होते. व नेहमीच प्रोत्साहन देत होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शालीकराम कराडे, सहायक शिक्षक खुणे मेडम, मडावी मेडम, चौधरी सर, टी. एस. कराडे, जे. टी. भैसारे, गुरनुले सर, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.