संगणक परिचालक यांच्या मदतीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण संगणक परिचालक सरसावले

 

 

कोरची

कोरची तालुक्यातील नांदळी ग्रामपंचायतचे संगणक परिचालक रामसेवक बंजार यांच्या उपचारासाठी संगणक परिचालक संघटना गडचिरोली यांच्या कडून ६७००० रु. आर्थिक मदत करन्यात आली आहें. दिनांक 19/08/2023 रोज शनिवारला नांदळी ग्रामपंचायतचे संगणक परिचालक रामसेवक बंजार हे आपल्या वडिलासोबत आपल्या ताईच्या गावी तिडका येथे जात होते तेव्हा अचानक त्यांचे टू-व्हीलर वरचे नियंत्रण सुटल्याने त्यांचा घोनाडी गावाजवळ अपघात झाले.

त्या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळे त्याना गोंदिया येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, तेव्हा त्याला उपचारासाठी किमान 3 लाख – रु रक्कम सांगण्यात आले. त्याची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी तालुका संघटनेच्या अध्यक्षांना संपर्क केला. तेव्हा कोरची तालुक्याचे तालुका अध्यक्ष विकेश उंदिरवाडे यांनी तात्काळ जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांना संपर्क केला आणि जिल्हाध्यक्ष तथा राज्यउपाध्यक्ष मुकेश नामेवार आणि जिल्हा सचिव संदीप बुरमवार यांनी तात्काळ सर्व तालुका अध्यक्ष यांना सूचना देऊन मदत निधी जमा करायला सांगितली आणि दिनांक 21/08/2023 रोज सोमवार ला कोरची तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी प्रत्यक्ष गोंदिया ला जावून त्यांना ६७००० हजार रुपयाची मदत केली.

या अगोदर सुद्धा जिल्ह्यात आतापर्यंत 6 ते 7 संगणक परिचालक यांना आर्थिक मदत केली आहे. मदत निधी देतेवेळी कोरची तालुक्याचे अध्यक्ष विकेश उंदिरवाडे, राजकुमार बडोले, उपाध्यक्ष, भूपेंद्र कोसारे सचिव, उत्कंठा मोहुर्ले कोषाध्यक्ष, त्रिवेश चौहान माजी तालुका उपाध्यक्ष, छायाताई सहारे, संदिप लाडे, कोमन फुलकवर उपस्थित होते.