कोरची तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्यामुळे शिक्षक दिलीप नाकडे यांचा महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याहस्ते सत्कार

 

 

कोरची

गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भागातील जिल्हा मुख्यालयापासून जवळपास १५० किलोमीटर अंतरावर असलेले छत्तीसगड सीमेवरील आदिवासीबहुल गाव जैतानपार येथिल जिल्हा परिषद शाळा (प्राथमिक गट) आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक दिलीप रावजी नाकाडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२३ मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय सचिव रंजीत सिंग देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते ०५ सप्टेंबरला शिक्षक दिनी शिल्ड देवून सत्कार करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२३ या वर्षा करिता गडचिरोली जिल्ह्यातील चार शिक्षकांची नियुक्ती झाली. त्यामध्ये कोरची तालुक्यातील शिक्षक दिलीप रावजी नाकाडे हे असून त्यांना विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदन दिले जात आहे. नाकाडे शिक्षकांनी एक