कोरची:-
तालुक्यातील धनंजय स्मृती माध्य. तथा उच्च माध्य.विद्यालय बेतकाठी येथे राष्ट्रीय विज्ञान् नाट्य उत्सव 2023-2024 अंतर्गत कोरची तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सव आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धेत तालुक्यातील बरेच शाळांनी सहभाग घेतला होता.नाट्यउत्सव स्पर्धेचे विषय,अन्य मिलेट- श्रेष्ठ आहार, खाद्य सुरक्षा, दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य सेवेतील सध्याची वर्तमान प्रगती, समाजातील अंधश्रद्धा हे होते. सदर स्पर्धेत सर्वच शाळांचे सहभाग उत्तम होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक धनंजय स्मृती विद्यालय बेतकाठी येथिल चमुने पटकावले. द्वितीय क्रमांक ज़िल्हा परिषद हायस्कुल बेडगाव येथिल चमुने पटकावले. ,तृतीय क्रमांक भगवंतराव हायस्कुल बोटेकसा येथिल चमुने पटकावले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनंजय स्मृती विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग नागपुरे ,तर कार्यक्रमाची उद्घाटक शुक्ला सर गटसाधन् केंद्र कोरची,प्रमुख अथिती म्हणून श्री कुणाल कोचे कोरची,ज्येष्ठ शिक्षक कापगते सर,मुंगुलमारे सर,बिझलेकर सर, सहारे मॅडम,श्री.नागपुरे सर बोटेकसा, विद्या उंबरकर बेडगाव उपस्थित होते,कार्यक्रमाचे संचालन होमराज बिसेन ,तर आभार प्रदर्शन प्रा.मुंगणकर सर यांनी मानले.