कोरची येथे पत्रकार भवनासाठी जागा व निधी द्या; कोरची तालुका वाईस ऑफ मीडियाची मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन

 

 

कोरची

कोरची तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार संघ राहत आहे परंतु पत्रकार बांधवांसाठी स्वतंत्र पत्रकार भवन नाही. त्यामुळे कोरची तहसील येथे आढावा बैठकीला आलेले राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना तालुका वाईस ऑफ मिडिया संघटनाकडून बुधवारला निवेदनातून पत्रकार भवनासाठी जागा व निधीसाठी मांगणी केली आहे.

निवेदनात कोरची तालुका हा अतिदुर्गम अतिसंवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो येथे अनेक वर्षांपासून तालुक्यातील पत्रकार विविध समस्या शासनापुढे मांडत आहेत. कोरची येथील पत्रकार बांधवांसाठी स्वतःच व्यासपीठ म्हणून एक पत्रकार भवन इमारतीची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे जागा व निधीची मांगणी मंत्री धर्मराबाबत आत्राम यांना निवेदन देऊन विंनती केली आहे.

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना निवेदन देताना गडचिरोली व्हाईस ऑफ मिडिया संघटना जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर वैरागडे, तालुका अध्यक्ष राहुल अंबादे, सरचिटणीस मधुकर नखाते, सदस्य राकेश मोहुर्ले उपस्थित होते.