कोरची
कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नियमित पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे येथील नागरिकांना आरोग्यविषयक अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे कोटगूल येथे पूर्णवेळ नियमित वैद्यकीय अधिकारी द्यावे म्हणून २० सप्टेंबर बुधवारला कोरची तहसीलदारामार्फत गडचिरोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगूल येथील वैद्यकीय अधिकारी यांची बदली मागील दोन महिन्यापूर्वी झाली आहे. अजूनही या ठिकाणी नवीन वैद्यकीय अधिकारी पाठवलेले नाही. कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सर्व डॉक्टर कंत्राटी असल्यामुळे रुग्णांना वेळेवर बरोबर उपचार मिळत नसल्याने अधिक प्रमाणात रुग्णांना रेफर केले जाते. कोटगुल हा परिसर आदिवासी आणि अतिदुर्गम भाग असून या परिसरात ४० वर गावे आहेत असे असून खाजगी डॉक्टर देखील या परिसरात राहत नाही. या प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्रोच्यावेळी अनेकदा रुग्ण दवाखान्यात दाखल झाले की त्याना कोरची किंवा गडचिरोली रेफर केल्या जाते. त्यामुळे गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात येत आहे. कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ नियमित वैद्यकीय अधिकारी पाठवण्यात यावा अन्यथा दहा दिवसात कोटगुल प्राथमिक केंद्र येथे तालाठोको आंदोलन करण्यात येण्याचा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.
कोरची तहसीलदार प्रशांत गड्डम यांना निवेदन देताना माजी पंचायत समिती सभापती श्रावण कुमार मातलाम, नागपूर ग्रामपंचायत उपसरपंच परमेश्वर लोहंबरे, प्रतिष्ठित नागरिक चंद्रशेखर उमरे, राजेंद्र शेखावत, दानशूर हलामी, लिलेश मडावी, धर्मेंद्रकुमार टाटपलान, देवराम हारामी, सुरेश भारद्वाज, लखनलाल सोनवाणी, विजय उमरे, अर्जुन मुलेटी, सूर्यप्रताप मडावी, आशिष नैताम, यशवंत मडावी, भोगेंद्र कोटगले, मिथुन तांबीकर, मनूराम नैताम आदि उपस्थित होते.