महाविद्यालयात तंबाखू नियंत्रणविषयक मार्गदर्शन

 

 

कोरची

स्थानिक वनश्री महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विद्यमाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य तथा रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. टी. चहारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक इतिहास विभागप्रमुख प्रा. आर. एस रोटके होते. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. एस. एस. दोनाडकर, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. एम. डब्लू. रुखमोडे, प्रा. समीर मिसार, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील मानसोपचार समुपदेशक, राहुल चाव्हरे, रुपेश भैसारे,समाजकार्यकर्त्या मीना दिवटे आदी प्रमुख उपस्थित होत्या.

कार्यक्रमा दरम्यान समाजकार्यकर्त्या मीना दिवटे यांनी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना म्हणाले की, महाविद्यालयीन विध्यार्थांमध्ये तंबाखू विरोधी जनजागृती करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना राबविण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक यांना तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले. तंबाखू सेवन हे जगातील बरेच आजार आणि मृत्यूचे कारण आहे. त्यामुळे त्यामुळे तंबाखू सेवन करू नये असेही त्या म्हणाल्या अध्यक्षीय भाषण करतांना जेष्ठ प्राध्यापक आर. एस. रोटके म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतः व आपल्या कुटुंबातील व्यक्तींना तंबाखू व्यसनापासून दूर ठेवण्याचा ठेवावे असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. गुलाब बावन थडे यांनी केले तर आभार प्रा. एम. डब्लू. रुखमोडे यांनी केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने विद्यार्थी व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.