ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोरची तालुक्यात काँग्रेसची सरशी, आठ पैकी तीन जागेवर सरपंच काँग्रेसचे

कोरची –

5 नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील 7 ग्रामपंचायतचे सार्वत्रिक निवडणूक पार पडले व एक ग्रामपंचायत हे बिनविरोध निवडून आलेली होती. आज लागलेल्या निवडणुकीच्या या निकालामध्ये काँग्रेस पक्षाचा वरचष्मा दिसून येत असून आठ ग्रामपंचायत पैकी मुरकुटी, पिटेसूर व जांभळी येथील ग्रामपंचायत मध्ये काँग्रेसच्या सरपंचांनी बाजी मारली तर दवंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व कोटरा आणि बोदालदंड येथे भाजप व नवेझरी आणि सातपुती येथे स्थानिक गटाच्या कार्यकर्त्यांनी सरपंच निवडून दिले.

या ग्रामपंचायत निवडणुकीमधून आता भविष्यातील निवडणुकीची सुद्धा रणधुमाळी सुरू झाली असल्याचे दिसून येत असून निवडून आलेल्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून व मिठाई वाटून आनंद साजरा केला.