ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोरची तालुक्यात भाजपाचा डंका, आठ पैकी पाच ग्रामपंचायतीवर ताबा

 

कोरची
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत आठ पैकी पाच ग्रामपंचायतीवर भाजपने विजय मिळवित तालुक्यात वर्चस्व निर्माण केला आहे भाजपने काबीज केलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कोटरा, बोदालदंड, नवेझरी, सातपुती व जांभळी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. पिटेसूर ग्रामपंचायत काँग्रेस, मुरकुटी ग्रामपंचायत शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, दवंडी अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आहे.
कोटरा ग्रामपंचायत मध्ये शांती रमेश मडावी ह्या सरपंच पदावर निवडून आल्या तर सदस्य म्हणून प्रिया रामलाल मडावी, राहुल मनिराम मलगाम, सरिता उमेनसिंग मडावी, मधुकर रामचंद्र मेश्राम विजयी झालेले आहेत. बोदलदंड ग्रामपंचायत मध्ये पंचशीला रामकुमार बोगा सरपंच पदावर निवडून आल्या तर सदस्य म्हणून हेमंत लालसाय बोगा, प्रवीण जागेश्वर कुमरे, छबीला सागर बोगा, बिसोबाई समारु सोरी हे विजयी झालेले आहेत. नवेझरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदावर सुरेखा नरेश आचले सदस्य म्हणून परमेश्वर दयाराम आचले, पतिराम सखाराम हिडामी हे उमेदवार विजयी झाले. सातपुती ग्रामपंचायत मध्ये सरपंच अनिता बैसाखु नुरुटी, सदस्य रविता मदन हिडामी, दिलीप श्यामलाल मडावी, मंसाराम रामसिंग बोगा, विलास इंदरलाल कुमरे, देवजी सनुराम हिडामी, सुरजा दामू मडावी हे विजयी झाले आहेत. जांभळी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदावर धनायाबाई जैलाल मडावी तर सदस्य पदावर मोहन काशीराम कुंभरे यांनी विजय प्राप्त केला. पिटेसूर ग्रामपंचायत मध्ये सदस्य पदावर सुमरीबाई मंगलुराम टेकाम, किरण सनोट मुलेटी निवडून आले. एकूण आठ ग्रामपंचायत पैकी एक जांभळी ग्रामपंचायत बिनविरोध होती. दवंडी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर मुरकुटी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर काँग्रेस पक्ष केवळ पिटेसूर या एका ग्रामपंचायतवर समाधान मानावे लागले.
कोरचीत भाजपने ५ ग्रामपंचायतीवर ताबा मिळवीत जोरदार मुसंडी मारली आहे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार आतिषबाजी करून कोरचीतील भर चौकात मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. तसेच विजयी उमेदवारांचा स्वागत आणि सत्कार भाजप तालुका अध्यक्ष नसरुद्दीन भामानी, डॉक्टर शैलेंद्र बिसेन, प्रा. देवराव गजभिये, आनंद चौबे, कमल खंडलवाल, नंदलाल पंजवानी, रामकुमार नाईक, घनश्याम अग्रवाल, मेघश्याम जमकातन, गोविंद दरवडे,अनिल वाढई, मनोज टेंभुर्णे या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच विजयासाठी भाजपचे सदाराम नूरुटी, रामु बोगा, रूपचंद देशमुख, सगीर शेख, मकसूदन महामुळा, देवचंद दखणे, रंजीत मेश्राम, वसंत मेश्राम, रामदास आचला, दयाराम आचला, नामदेव धावडे, हरिश्चंद्र मेश्राम, छगन मेश्राम, कैलास मेश्राम, रमेश मडावी, विलास होळी, दुरुगसाय उईके, बिजलाल गायकवाड, दीपक कोरेटी, सुनील मेश्राम, विनोद मेश्राम, नेवचन हिडामी, सुकलाल हिडामी आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे.