कोरची
काळ केव्हा झेप घेत एखादी कुटूंबातील मुख्य कर्ता व्यक्ती अचानक सर्वांपासून दूर जाईल हे सांगता येईना असे असून वाढदिवसाच्या दिनीच अशी घटना घडली तर वाढदिवसाच्या शुभेच्छा कि, भावपूर्ण श्रद्धांजली द्यावे हे अवघड ठरते. अशीच एक घटना कोरची येथील एक शिवणयंत्र प्रशिक्षक, प्रतिष्ठित व्यापारी, शेतकरीसोबत घडली आहे. त्यांचे नाव कोमलकुमार बालकदास अंबादे (४३) रा. कोरची असे आहे. कुटूंबातील मुख्य कर्ता असून दिवाळी सणाच्या दोन दिवसांपूर्वी नागपूर वरून खरेदीकरून कोरचीला स्वतःच्या कारनी येत असताना गावाजवळ ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे डोक्यातील मेंदूची मुख्य नस फाटली आणि रक्त डोक्यात पसरल्यामुळे ते कोमात गेले. यानंतर तात्काळ प्राथमिक उपचार करून नागपूरच्या खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले.
सात दिवस दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत अखेर उपचारादरम्यान आठव्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी म्हणजे वाढदिवसाच्या दिनीच सकाळी 10:30 ला दुखद मृत्यू झाले. त्यामुळे अंबादे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावे की भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावे हे कुटुंबासह आप्तेष्ट परिवार मित्रमंडळी पुढे प्रश्न निर्माण झाले. कोमलकुमार अंबादे हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील वडेकसा गावातील रहिवासी आहेत.
लग्नानंतर कोरचीमध्येच वास्तव्यास राहुन कुटुंबाच पालन पोषण व उदरनिर्वाह करत होते यासाठी त्यांनी सुरुवातीला एका खाजगी शाळेत शिक्षक नंतर शिवणकाम शिकून संस्था सुरू केली आणि शिवण यंत्र प्रशिक्षक बनून त्यांनी अनेक महिला व मुलींना कपडे सीलाईचे शिक्षण दिले व त्यांना आत्मनिर्भर बनविले तसेच सामाजिक कामात नेहमी अग्रेसर होते, अनेक गरीब कुटुंबाची त्यांनी मदत केली याशिवाय ते गावातील प्रतिष्ठित व्यापारी, उत्कृष्ट शेतकरी सुद्धा होते हसमुख व सर्वांशी मन मिळवूपणा असल्यामुळे नेहमी त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये आदर व सन्मान होता यामुळे अनेक जण त्यांची प्रकृती दुरुस्त व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करीत होते परंतु डोक्यातील मेंदूची मुख्य नस फाटली आणि रक्त डोक्यात पसरले त्यामुळे कोमात गेले त्यांच्यावर नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात डोक्याचा तज्ञ डॉक्टर कळून उपचार देत होते परंतु शेवटी त्यांची १६ नोव्हेंबर सकाळी १०:३० दरम्यान मृत्यूची बातमी ऐकताच तालुक्यासह परिसरात सर्वत्र नागरिकांमध्ये शोककळा पसरले आहे.
महत्वाचे लोकमत तालुका प्रतिनिधी कोरची राहुल अंबादे यांचा सख्खा चुलत भाऊ कोमलकुमार बालकदास अंबादे आहें व यांना पत्नी आशा, पंधरा वर्षाची एक मुलगी गुणगुण, दहा वर्षाचा मुलगा रिधम व आई-वडील एक लहान भाऊ असा खूप मोठा अंबादे परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर १७ नोव्हेंबर शुक्रवारी सकाळी ११ वाजता दरम्यान कोचीनारा येथील स्मशानभूमीवर अंतिम संस्कार करण्यात आले.