दि.22/11/2023 ते दि.23/11/2023 रोजी पोलिस स्टेशन कोरची येथे भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉल स्पर्धा व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा व भव्य जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आले होते . सदर स्पर्धेमध्ये पोलीस स्टेशन कोरची हद्दीतील व्हॉलीबॉल खेळाचे 12 संघ व कब्बडी खेळाचे 20 संघ सहभागी झाले होते.
# हॉलीबॉल स्पर्धेमध्ये
1) प्रथम क्रमांक कोरची संघाणी पटकवीला असुन 3000/-रु व प्रशस्तीपत्र
2 ) द्वितीय क्रमांक मोहगांव संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 2000/- व प्रशास्तीपत्र
3 ) तृतीय क्रमांक कुमकोट संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 1000/- रु.व प्रशास्टिपत्र देण्यात आले.
तसेच
# कब्बड़ी स्पर्धाचे
1) प्रथम क्रमांक लेकुरबोडी संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 3000/- रू.,
2) द्वितीय क्रमांक आलिटोला संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 2000/- रू.,
3) तृतीय क्रमांक बोडेना संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 1000/- रु.मा. मानायवरांचे हस्ते प्रमाणपत्रे देउन सन्मानित करण्यात आले.
तसेच भव्य जनजागरण मेळाव्यात पोलीस स्टेशन कोरची हद्दीतील उपस्थित नागरिकांना विविध शासकीय विभागाचे अधीकारी यांचे कडून शासकीय योजनेबाबत मार्गदर्शन करून योजनेचे लाभ घेणेबाबत सांगितले सदर जनजागरण मेळावा कार्यक्रमाला मा. प्रशांत गडम सा. तहसीलदार कोरची, मा. फाये सा. संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती कोरची, मा. मसराम सा. तालुका कृषी अधिकारी कोरची मा. Dra. मनोरे सा. नेत्र चिकित्सक ग्रा. रू. कोरची, कु. निळा किन्नके मुक्तीपथ कोरची, इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
तसेच मेळाव्याला उपस्थित नागरिकांना खालीलप्रमाणे योजनेचे लाभ देण्यात आले….
1) कास्ट :-4
2) आधारकार्ड :-
3) आभा कार्ड :-25
4) आयुष्य मान कार्ड :-3
5) उत्पन्न दाखला :-10
6) नेत्र तपासणी :-18
7) कृषी विभाग :-54
8) भारत गॅस वाटप :-9
9) ज्वारी बियाणे वाटप :-20 (4 किलो प्रति बॅग प्रमाणे )
10) साड्या वाटप :-100 (महिलांकरिता )
सर्व खेळाडूंना व मेळाव्याला उपस्थित नागरिकां करिता चाय, नास्ता व उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
सादर जनजागरण मेळाव्याला पोस्टे हद्दीतील 250 ते 300 नागरिक उपस्थित होत