मा शरद पवार गटाची जिल्हा आडवा बैठक संपन्न.

दिनांक ०१डिसेंबर 2023 रोज शुक्रवार ला ठीक ४.०० वाजता गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संघटनाचीआडवा बैठक घेण्यात आले . या बैठकीला आदरणीय श्री अनिल बाबू देशमुख माझी गृहमंत्री म.राज्य यांच्या मार्गदर्शनात तथा माननीय अतुल गण्यापवार जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली जिल्हा यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आले. यामध्ये तालुकाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. त्यामध्ये कोरची तालुकाध्यक्ष पद श्री प्रतापसिंग कानोजी गजभिये यांना देण्यात आले.
प्रतापसिंह गाजबिये यांनी याचे श्रेय तालुक्यातील कार्यकर्ते तसेच तालुक्यातील सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय केलेल्या कामामुळे मिळाल्याचे बोलताना सांगितले.
प्रतापसिंह गाजबिये यांना तालुकाध्यक्ष पद मिळाल्यामुळे कार्यकर्ते मध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि तालुक्यात पक्षाचे काम जोमाने करण्याचे निर्धार केला आहे. तालुक्यातील कार्यकर्त्या कळून गजबिये यांना पुष्पहार देवून व पुढील वाडचालीस शुभेच्छा देण्यात आले.