जि.प. शाळा कोरची येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाननिमित्त अभिवादन 

 

कोरची:: येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्याकरिता कार्यक्रम घेण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मारोती अंबादे, प्रमुख पाहुणे प्रमोदिनी काटेंगे मु.अ. ,कांता साखरे ,आरती चांदेकर, महेश जाळे, निळा किन्नाके मुक्तीपथ समन्वयक, बुद्धे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान भुषविले. निधी काटेंगे, प्रथमा भैसारे, रौनक अंबादे, अजबा जाडिया, साक्षी मेश्राम ,करिश्मा धोंडणे, राशी बांगरे यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्रावर भाषण दिले. अजबा जाडिया वर्ग 7वा ह्या विद्यार्थ्यीनीने इंग्रजीमधून भाषण दिले. काही विद्यार्थ्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्रावर गीत गायन केले. कांता साखरे यांनी बाबासाहेब यांच्या शिक्षणातील अडचणी , विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष देऊन खूप मोठे होण्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. मुक्तीपथ समन्वयक निळा किन्नाके यांनी संविधानामुळे आपण सुरक्षित आहोत. याबद्दल मार्गदर्शन केले. प्रमोदिनी काटेंगे यांनी महिलांची सुरक्षितता यांविषयी मार्गदर्शन केले. महेश जाळे, मारोती अंबादे ,आरती चांदेकर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्रावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमचे सूत्रसंचालन मोनाली सिंद्राम तर आभारप्रदर्शन राशी बांगरे या विद्यार्थ्यीनीने केले.