आश्रम शाळा कोटरा येथे महामानवास अभिवादन

 

कोटरा:-

स्वर्गीय मीनाताई ठाकरे शिक्षण संस्थेद्वारा संचालित अनुदानित मासाहेब आश्रम शाळा कोटरा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनील अवसरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुकेश हरडे, रमेश नान्ने तर प्रमुख अतिथी म्हणून नमो मेश्राम ,अरविंद काशीवार, सुधाकर कामडी ,रमेश शहारे, भरत लंजे, मोतीराम मोहूर्ले ,शिरेश ढवळे , यामीना हलामी ,राकेश कुलसुंगे, सुशील मस्के ,भूपेश कामडी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून मा ल्यार्पन करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

उपस्थित सर्व शिक्षक वृंदांनी सर्व विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालून आपली प्रगती करून घ्यावे असे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक नमो मेश्राम तर संचालन रमेश शहारे यांनी व उपस्थितांचे आभार अरविंद काशीवार यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शालेय मंत्रिमंडळातील सर्व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.