२ लाख ७८ हजारांचा घरफोडी प्रकरणातील आरोपीला कोरची पोलिसांनी २४ तासात केली अटक

 

 

न्यायालयाने आरोपीला तीन दिवसाची सुनावली पोलीस कोठडी 

 

कोरची

कोरची तालुक्यातील टेकाबेदड गावातील रहिवासी महिला नीलिमा अंताराम मेश्राम यांच्या राहत्या घरी ११ डिसेंबर रात्रौ ११:३० वाजता दरम्यान कपाटातील ३ तोळ सोन, २० तोळ चांदी व १४ हजार रोख असे एकूण २ लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याची घटना घडली. त्यानंतर कोरची पोलीस स्टेशन येथे १२ डिसेंबर उशिरा रात्रौ पर्यंत तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर कोरची पोलिसांनी २४ तासातच संशयित आरोपीला छत्तीसगड वरून अटक केले. देवेंद्र रामलाल बन्सोड २८ वर्ष रा. सिंगायटोला, ता मोहला/मानपूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नीलिमा मेश्राम यांच्या घरातील कपाटातुन सोन्याची दोन गोप, तीन अंगठी, तीन जोड कानातले असे साडे तीन तोडा सोना तर चांदीचा हात कडा, दोन चांदीचे सिक्के व १४ हजार रोख रक्कम चोरी करून आरोपी पसार झाला होता. कोरची पोलीस स्टेशन येथे आरोपी विरोधात ३८०,४५७ कलमा अनन्वये गुन्हा दाखल करून २४ तासाच्या आत आरोपीला अटक करन्यात आले. त्यानंतर पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी आरोपी देवेंद्र बन्सोड याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीकडून चोरीतील ३ तोडे सोने, २० तोडे चांदी आणि ४ हजार ८०० रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. सदर प्रकरणातील गुन्ह्याचे तपास कुरखेडा उपविभागीय अधिकारी साहिल झरकर, कोरची पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार हे करीत आहेत.