रात्रभर गावकरी जागले आणि पहाटे ट्रक चालक ट्रक घेऊन सुसाट वेगाने पसार
कोरची
कोरची तालुका मुख्यालयापासून १३ किलोमीटर अंतरावर येत असलेल्या सावली गावातील नागरिकांनी बुधवारच्या रात्री ९ वाजता दरम्यान अवैधरित्या दोन ट्रकामध्ये जनावरे भरून कत्तलीसाठी निघालेल्या गावकऱ्यांनी गावात अडविले होते. ट्रक क्रमांक NL 08 D 0404 आणि MH 40 CM 2712 अशा क्रमांक असलेल्या दोन ट्रकामध्ये अंदाजे १०० च्यावर गाय व बैल कोंबून कत्तलीसाठी नागपुर शहरात नेत असल्याचे आढळून आले. या दोन्ही ट्रकामधिल ड्रायव्हर गावातील लोकांचा गर्दीमुळे फरार झाले. परंतु पहाटे गावातील नागरिक झोपून असताना तस्कर ट्रक घेऊन सुसाट वेगाने पसार झाले.
मागील पंधरा दिवसापासून मसेली-कोटरा मार्गे कैमुल-सावली गावाकडून रात्रीच्या वेळी पाच ते सहा ट्रक या मार्गाने नियमितपणे जात होते त्यामुळे गावकऱ्यांना या ट्रकमध्ये जनावरांची तस्करी होत असल्याचा संशय आले आणि बुधवारी रात्रौ गावकरी एकत्र होत तस्करी करणाऱ्या दोन ट्रकाना अडविले.
दरम्यान गावातील पोलीस पाटील शांतीलाल नैताम यांच्या सहकार्याने कोरची पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांना अवैध जनावरे तस्करी करणाऱ्या ट्रका पकडल्याची माहिती दिली त्यानंतर फडतरे यांनी गावकरी लोकांना ते ट्रक पोलीस स्टेशनला घेऊन या असे सांगितले परंतु आपल्याकडे ड्रायव्हर नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी म्हटले की मी ड्रायव्हर पाठवतो गाड्या पोलीस स्टेशनला सोबत घेऊन या उशिरा रात्रौ पर्यंत गावामध्येच गावकऱ्यांनी त्या दोन ट्रकांना अडवून जागत बसले होते. यावेळी पो.पाटील, माजी उपसरपंच, गावातील महिला व नागरिक होते.
परंतु सावली गावात रात्री पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांनी दोन ड्राइवर पाठवीले तेव्हा गावकरी म्हणाले की घटना स्थळी पंचनामा करुण दोंन्ही ट्रका आपण घेऊन जावे नक्षल दृष्ट्या पोलीस त्या ठीकानी रात्रो जाऊ शकलें नाही. आणि रात्रों घटनास्थळी काही लोक झोपले तर बाकी लोक घरी ज़ाऊन झोपलें याचा फायदा घेत ट्रक ड्राइवर पहाटे ४ वाजता अचानक ट्रक सुरू करुण वेगाने पसार झाले.
गावकरी
गाय व बैलांची तस्करी थांबली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व गावकरी या मार्गाने अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या या दोन ट्रकांना अडविले. अशा तस्करामुळे आमच्याकडील गाय व बैलांची संख्या कमी होत असून अशा तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे.
राधेश्याम मडावी
गावकरी सावली.