कोरची
जय मा दंतेश्वरी मानस प्रचार समितीच्या वतीने तालुक्याच्या कोचिनारा येथे ३० व ३१ डिसेंबर रोजी दोन दिवसीय सस्वर मानस रामायण गायन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यासंब्रमात १० भजन मंडळींनी सहभाग घेतला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांनी भजन मंडळींचा गौरव करण्यात आला.
या संमेलनाचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी नगरसेवक मनोज अग्रवाल होते. सह उद्घाटक भाजपा तालुकाध्यक्ष नसरुद्दीन भामानी, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष (अजीत गट) सियाराम हलामी होते. प्रमुख अतिथी म्हणून आनंद चौबे, प्रा. देवराव गजभिये, गडचिरोली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकवर, सरपंच सौ सुनीता मडावी, उपसरपंच रुपराज देवांगन, डॉ. शैलेंद्र बिसेन, नगरसेवक घनश्याम अग्रवाल, ग्रामपंचायत सचिव दामोदर पटले, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक अशोक कराडे, पत्रकार नंदकिशोर वैरागडे, राहुल अंबादे, आशिष अग्रवाल, जीवन भैसारे, भागीरथ बेचंदकुवर, बी एफ सहाडा, रुखमण घाटघूमर, अनिल गुप्ता, झाडूराम मेश्राम, मुख्याध्यापिका मंदा आवारी मॅडम, भुनेश्वर तुमरेटी, नेत्राम कौशिक, भास्करजी ठोंबरे महाराज, समशेरखा पठाण, सोबीत मडावी, ग्रा स टेमलाल देवांगण, परदेशी दूधकव्हर , योगिता डीलर, पोलीस पाटील श्रावण घावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्तीसगड सीमेलगत कोरची तालुक्यातील कोचिनारा येथे छत्तीसगड राज्यातील १० भजन मंडळी रामायण संमेलनात सहभागी झाले होते. कोरची तालुका हा छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असल्यांने या भागातील लोकांचे छत्तीसगड राज्यासोबत बेटी-रोटी चे व्यवहार आहेत तसेच या भागातील लोकांची बोलीभाषा ही छत्तीसगढी अधिक प्रमाणात आहे त्यामुळे या भागात छत्तीसगढी व हिंदी भाषेत छत्तीसगढमधील रामायण मंडळ संमेलनात भाग घेत असून संपूर्ण वाद्यही भजन मंडळीचीच होती. एका भजन मंडळींला दोन तासाची वेळ देण्यात आली होती. यावेळी रामायण कथा सांगून कथेला अनुसरून भजन सादर करण्यात आले विशेष म्हणजे मागील १८ वर्षापासून या रामायण संमेलनाचे गावकरी आयोजन करीत आहेत. आणि या रामायण संमेलनाचे आयोजन समितीचे अध्यक्ष मुस्लिम समाजाचे समशेरखा पठाण हे आहेत.
दरम्यान आरमोरी विधानसभाचे आमदार कृष्णा गजबे यांना नुकतेच आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार मिळाल्यामुळे येथील समितीच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तर आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका मंदावरी मॅडम तर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त दामोदर जी पटले ग्रामपंचायत सचिव यांचाही यावेळी आयोजक समितीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच रूपराज देवांगन यांनी तर सूत्रसंचालन हिरामण मेश्राम यांनी केले. आभार शिक्षक नमुदेव गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष समशेरखा पठाण, उपाध्यक्ष दयालू बढईबंश, सहउपाध्यक्ष कांताराम जमकातन, सचिव वसंत भक्ता, सहसचिव कार्तिक देवांगन, पवन कोराम, कोषाध्यक्ष पखिलाल बागडेरिया, प्रताप सुवा, संचालक नमुदेव गायकवाड, किशोर कराडे, संरक्षक खोरबहारा नायक रघुराम देवांगन पुरुषोत्तम सहाडा यांनी सहकार्य केले.