शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील उपक्रम
कोरची-: येथील स्थानिक शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा आणि एकलव्य आदर्श निवासी इंग्रजी स्कूल कोरची यांच्या सयुक्त विदयमाने देशातील पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व जयपाल मुंडा जयंती निमित्त विनम्र आदरांजली वाहण्यात आली.तसेच बालिका दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वयंशासन राबविण्यात आले .या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थीनींनी हिरहिरेने भाग घेतला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कोरची येथील माळी समाजाचे अध्यक्ष श्री राकेश मोहुर्ले,श्री. मनितराम मडावी,साखरकर मॅडम उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांनी भुसविले तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील प्रा.परेश मेश्राम, प्रा.रमेश रामटेके, प्रा.हरेश कामडी, प्रा.अरुण कायंदे, प्रा.मनोज गजभिये, प्रा.अभिमन्यू वाटघुरे,प्राध्यापिका यामिनी देशमुख,प्रा.दिलीप कचलामी, भैयालाल कुरसंगे,गुरुराज मेंढे,देवेंद्र मडावी,संतोष सहारे,डाकराम ठाकरे, गिता राऊत, सुषमा अंबोने,लीना वाटघुरे,मनोज आचार्य,प्रशिल जांभूळकर,निलिमचंद कापगते, अश्विनी कापगते,भारती चौधरी, दिक्षा टेभुर्णे, एस.पचारे ,महेश उरकुडे,नैना येंगलवार,सुधाकर पुसाम, अधिक्षक निखिल दाणे, अधिक्षिका सिमा कुरेकार,शिवानी झोडगे आदी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी घाटघुमर व डिपंल सोनार हिने केले तर आभार प्रदर्शन कुनकुम मोहुर्ले हिने केले.