शासन आपल्या दारी अभियानाच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे नवे अभियान जाहीर केले आहे

राज्यातील महिलांना या अभियानातुन लाभ देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात देखिल या अभियानाचे नियोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत कोरची तालुक्यात मौजा कोटरा येथे दिनांक 06.01.2024 रोजी मासाहेब आश्रम शाळा, कोटरा च्या प्रांगणात शिबीराचे आयोजन करण्यात आले .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. कचरीबाई काटेंगे, माजी सभापती, पं.स.कोरची , उदघाटक म्हणुन सौ.शांतीबाई आर.मडावी सरपंच,कोटरा विशेष अतिथी म्हणून श्री.अनिल कोराम माजी जि.प.सदस्य, श्री.शामलाल गावळे, सरपंच, ग्रा.प.मर्केकसा, श्री.सरील मडावी,सरपंच, ग्रा.पं.नांदळी, श्री.किशोर झेड नरोटे, सरपंच, ग्रा.प. बिहीटेकला, श्री.तुलाराम मडावी, माजी सरपंच, ग्रा.पं. कोटरा श्री.जगदिश कपुरडेरीया,उपसरपंच ग्रा.पं.बिहीटेकला, प्रशांत गडृम तहसिलदार ,कोरची, डॉ. किरण जाधव पशुधन विकास अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरची तालुक्यातील कोटरा येथे घेण्यात आलेले हे पाचवे महिला सशक्तीकरण अभियान असून कोटरा, नांदळी, मर्केकसा, बोगाटोला, बिहीटेकला या पाच ग्रामपंचायतअंतर्गत , 19 गांवातील महिला/पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महसूल विभाग, तालुका कृषी कार्यालय, पंचायत विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग, उमेद बचत गट, बँक विभाग तसेच संजय गांधी योजना,सेतू, पुरवठा व निवडणूक विभागाने स्टॉल लावून विविध योजनांची माहिती देवुन तसेच गरजूंना लाभ दिले. सदर शिबीरात खालीलप्रमाणे लाभ वितरीत करण्यात आले.

* समग्र शिक्षा समवेशी शिक्षण , गटसाधन केंद्र, पंचायत समिती अंतर्गत रुहुल नैताम या दिव्यांग विद्यार्थ्याला ट्रायसिकल वितरण करण्यात आले

* नवज्योती महिला ग्रामसंघ, बिहीटेकला कडुन 2 बचत गटांना समुदाय गुंतवणुक निधी, प्रत्येकी रु.60,000/- चे घनादेश वाटप करण्यात आले

* मा संतोषी महिला प्रभाग संघ, भिमपुर यांचेकडुन बचत गटांना गौण वनउुपज संकलन जाळीवे वाटप करण्यात आले

* मग्रारोहयो अंतर्गत जॉबकार्डचे वितरण करण्यात आले.

* पोस्ट ऑफीसकडुन पोस्ट पेमेंट बँक कार्डचे वितरण करण्यात आले.

* पुरवठा विभागाकडुन शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. तर महसुल विभागाकडुन सात बारा, वनहक्क सातबारा व इतर दाखले देण्यात आले. तसेच उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

* संजय गांधी शाखेकडुन संगायो निराधार, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे लाभ देण्यात आले.

* ग्रामपंचायत कोटरा,मर्केकसा कडुन विविध प्रकाचे दाखले वितरीत करण्यात आले.

* दि गडचिरोली को-ऑप.बँकेकडुन बचत खाते व आर डी खाते उघडुन लाभार्थ्यांना लाभ दिले.

* तालुका आरोग्य विभागाकडुन विविध प्रकारच्या हजारो वैद्यकीय तपासण्या करण्यात आले.

* महिला व बाल कल्याण विभागाकडुन बेबी केअर किट वाटप करण्यात आले.

तसेच शिबीरस्थळी सेतु व आधार केंद्रकडुन आभा कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच इतर दाखले काढुन देण्यात आले.

 

कोटरा येथील शिबिरात एकाच छताखाली सर्व विभागातील २१ स्टॉल लावून जनजागृती करून लाभ देण्यात आले उपस्थित मान्यवरांकडून विविध योजनाबाबंत मार्गदर्शन कण्यात आले तर विविध लोककल्याणकारी योजनेची माहिती सुद्धा देण्यात आले. या शिबिराचे प्रास्ताविक तहसीलदार प्रशांत गड्डम तर आभार मसेली मंडळ अधिकारी एस एस बारसागडे यांनी केले