राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकांची आपसात भिडंत, एका चालकाचा मृत्यू, दुपारी 3 च्या दरम्यानची घटना

 

 

कोरची : कुरखेडा – कोरची मार्गातील राष्ट्रीय महामार्गावर कोरची मुख्यालयापासून 2 किलोमीटर अंतरावर मोहगाव गावनाजिक ट्रक क्रमांक CG – 10- AT -5482 छत्तीसगडहून आंध्रप्रदेश कडे ताडपत्री घेऊन जात असताना विरुद्ध दिशेने अलुमिनियम चे साहित्य छत्तीसगड कडे जात असलेल्या ट्रक क्रमांक KA – 01- AM – 4258 क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली धडक इतकी जोरदार होती की छत्तीसगढ कडे जाणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. सदर अपघातामध्ये एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून वाहक जखमी झाला आहे. दुसरा ट्रक चालक फरार झाला असून सदर घटनेची तपासणी कोरची पोलीस स्टेशन चे कर्मचारी करीत आहेत. सदर मार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे मार्गावर ट्रकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.