कोरची तालुक्यातील एकूण 29 ग्रामपंचायत व विविध विभागाचे मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाचे सोशल एडिट करण्यास सुरुवात झालेली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात राज्यातील विविध जिल्ह्यात, तालुक्यात विविध विभागांनी, पंचायती,यंत्रने मार्फत करण्यात आलेल्या कामाचे सोशल एडिट करण्याचा कार्यक्रम राज्य शासनाच्या सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई, संचालयाने निश्चित केली आहे.
त्यानुसार कोरची तालुक्यात दिनांक 13 ते 16 जानेवारी या कालावधीत गटविकास अधिकारी राजेश फाये यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हा साधन वेक्ती नेतलाल कोल्हे यांनी मनरेगा या विषयावर निवासी प्रशिक्षण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केले, यामध्ये ग्रामसाधन वेक्ती यांना, मस्टर पाहणी, मोजमाप पुस्तिका , MISपाहणी,प्रत्येक्ष कामाची पाहणी,तसेच ग्रामसभा आयोजना बाबत सखोल मार्गदर्शन केले.
त्यानंतर दिनांक 17 जानेवारी ते 25 फरवरी 2024 या कालावधीत प्रत्यक्ष मनरेगा कामाचे सोशल एडिट प्रक्रिया पूर्ण होनार आहे. त्यामध्ये सबंधित यंत्रणांकडून, कामाचे संबंधित दस्ताऐवज आणि कामाची प्रत्यक्ष स्थिती या संदर्भात पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये सिंचन विहीर, वृक्ष लागवड, रोपवाटिका, घरकुल, फळबाग, पांदण रस्ते, शेततळे वनतळे, मजगी,तळेखोलीकरण, मामा तलाव, तसेच मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभाचे काम, सोशल ऑडिट होणार आहे.