निधनवार्ता 

 

 

हृदय विकाराच्या झटक्याने वंदना गिरधारी जांभुळे यांचे निधन

 

कोरची

कोरची येथील बौद्ध समाजातील प्रतिष्ठित नागरिक, शिवण यंत्र प्रशिक्षक गिरधारीजी जांभुळे यांची पत्नी वंदना गिरधारी जांभुळे वय ४८ वर्ष रा. शासकीय आश्रम शाळा कोरची यांना राहत्या घरी आकस्मिक हृदय विकाराच तीव्र झटका आल्याने त्यांची रविवारी रात्री १२ वाजता दरम्यान दुःखद निधन झाले. ह्या मागील काही महिन्यांपासून आजारी असून घरीच उपचार घेत होत्या.

सोमवारी दुपारी २ वाजता कोचीणारा घाटावर त्यांची अंतविधी करण्यात येणार आहे. वंदना ह्या सुद्धा आपल्या पतीसोबत दुकानात शिवण काम करीत होत्या परंतु मागील काही वर्षांपासून हिप जॉईंट चा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांनी शिवणकाम सोडलं पण घरी राहून कपड्यांची हात काच बटन शिलाई करून पतीला मदत करीत होत्या. त्या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते परिसरातील नागिकमध्ये या दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, नात अस जांभुळे परिवार आहे.