कोरची ग्रामीण रुग्णालयात लवकरच रक्तपेठीची सोय होणार : डॉ. प्रमोद खंडाते जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिपादन

 

 

भव्य आरोग्य व दंत शिबीराचे उद्वघाटन संपन्न

 

कोरची

कोरची ग्रामीण रुग्णालय येथे लवकरच रक्तपेठीची सुविधा होणार असुन ५० खाटाचे सुसज्य दवाखाना काही वर्षातच सुरु होईल असे शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगीतले. दिनांक १८ जानेवारी २०२४ ते २१ जानेवारी २०२४ चार दिवसीय भव्य आरोग्य व दंत शिबीरांचे आयोजन ग्रामीण रुग्णालय कोरची येथे करण्यात आले आहें.

सदर शिबीरांचे उद्वघाटन गडचिरोली जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी केले तर अध्यक्ष म्हणुन कोरची नगरपंचायत नगराध्यक्ष श्रीमती हर्षलता भैसारे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणुन गडचिरोली निवासी वैघकिय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, रेडियोलाजिस्ट डॉ. नीलकंठ मसराम, डॉ. कुमरे अस्थिरोग तज्ञ, तालुका आरोग्य डॉ. विनोद मडावी, वैघकीय अधिक्षक डॉ. अभय थुल, पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक अमोल फडतरे, आशिष अग्रवाल, जितेद्र सहारे हे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे नियीमतपणे सोनोग्राफी व रक्तपेठीची सोय निमार्ण करुन द्वयावी अशी मागणी केली तसेच आरोग्य शिबारांच्या माध्यमातुन प्रत्येकांनी आपली तपासणी करुन संधीचे सोने करावे. तर शिबीरांचे उद्घाटन प्रंसगी अध्यक्ष म्हणुन नगराध्यक्ष श्रीमती हर्षलता भैसारे यांनी शिबीराचा लाभ शेवटच्या घटकांनी घ्यावा असे आवाहन केले.

शिबीरांचे सुत्रसंचालन रुपेश भैसारे, प्रास्ताविक डॉ. बागराज धुर्वे यानी केले तर आभार प्रमोद सातपुते यांनी केले. सदर शिबीरात आरोग्य तपासनी करण्यासाठी तालुक्यातील नागरिक उपस्थित झाले तर उद्घाटनानंतर शिबीरात विविध आजाचे तज्ञ डॉक्टर आले असुन रुग्नावर उपचार सुरू केले आहें.